50 लहान मुलांचे लैंगिक शोषण, पॉर्न व्हिडीओंची विक्री, ज्युनिअर इंजिनीअरच्या पत्नीला अटक

| Updated on: Jun 22, 2021 | 3:13 PM

जेई रामभवनची पत्नी दुर्गावती बाल लैंगिक शोषण प्रकरणात सहभागी असल्याचे समोर आल्याने तिला अटक झाली

50 लहान मुलांचे लैंगिक शोषण, पॉर्न व्हिडीओंची विक्री, ज्युनिअर इंजिनीअरच्या पत्नीला अटक
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा जिल्ह्यात (Banda District) लहान मुलांचे लैंगिक शोषण (Sexual Exploitation) करणाऱ्या आणि त्यांचे पॉर्न व्हिडीओ तयार करुन देशभर विकल्याचा आरोप असलेल्या ज्युनिअर इंजिनीअरच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सीबीआय अधिकाऱ्यांनी ज्युनिअर इंजिनीअर जेई रामभवनला आधीच चित्रकूट जनपदहून बेड्या ठोकल्या आहेत. (CBI arrests wife of child abuse accused junior engineer in Uttar Pradesh Banda)

जेई रामभवनची पत्नी दुर्गावतीही बाल लैंगिक शोषण प्रकरणात सहभागी असल्याचे समोर आले आहे. रामभवनच्या अटकेपासूनच ती सातत्याने साक्षीदारांवर दबाव आणत असल्याचा दावा केला जात आहे. साक्षीदारांना आमिष दाखवून ती गप्प बसवत असल्याचंही बोललं जातं. रामभवनने 50 हून अधिक लहान मुलांचे लैंगिक शोषण करुन त्यांचे पॉर्न व्हिडीओ केल्याचा आरोप आहे. हे व्हिडीओ रामभवन आणि त्याच्या पत्नीने देशभर विकल्याचाही माहिती आहे.

दुर्गामतीला न्यायालयीन कोठडी

सीबीआय अधिकाऱ्यांना दुर्गामतीच्या कृष्णकृत्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिला बांदा जनपदमधील नरैनीहून अटत केली. अटकेनंतर तिला बांदा कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला 4 जानेवरीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर तिची रवानगी मंडल कारागृहात करण्यात आली आहे.

आरोपी जेई रामभवन हा सिंचन विभागात ज्युनिअर इंजिनीअरच्या पदावर कार्यरत होता. सीबीआयने पुराव्यांच्या आधारे त्याला बेड्या ठोकल्या. गेल्या महिनाभरापासून रामभवन मंडल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या काळात रामभवनच्या चौकशीसाठी सीबीआयला पाच दिवसांचा रिमांड मिळाला होता.

सीबीआयच्या रडारवर आणखी आरोपी

पाच दिवसांच्या चौकशीनंतर आरोपीची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली. जेई रामभवन हा उत्तर प्रदेशातील बांद्यातील नरैनीचा रहिवासी आहे. दीर्घ काळापासून तो काळे धंदे करत होता. पत्नी दुर्गावतीही यामध्ये त्याची साथ देत होती. दाम्पत्यापलिकडे आणखी काही जण या कृष्ण कृत्यात सहभागी असल्याचा दावा केला जात आहे. सीबीआयच्या रडारवर आणखी काही जण असून तपास वेगाने सुरु आहे.

संबंधित बातम्या :

विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शिक्षकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

(CBI arrests wife of child abuse accused junior engineer in Uttar Pradesh Banda)