Mumbai Crime: पाहिले करायचे बाईक चोरी नंतर करायचे चैनसँचिंग; 17 गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

| Updated on: Jul 01, 2022 | 1:52 PM

दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात 17 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. हे दोन्ही आरोपी मुंबईमध्ये एका खाजगी कंपनीत काम करतात मौजमस्तीसाठी चोरी करायचे. विशेष म्हणजे पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून पहिले हे चोर मोटर सायकल चोरी करायचे . त्यानंतर चोरीच्या मोटरसायकलीवरून इतर परिसरात पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या वस्तू धूम स्टाईलने उडवायचे.

Mumbai Crime: पाहिले करायचे बाईक चोरी नंतर करायचे चैनसँचिंग; 17 गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
दिल्लीत पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या
Image Credit source: tv9
Follow us on

कल्याण- मुंब्रा परिसरातून (Mumbra area)मोटारसायकल चोरी करायचे त्यानंतर कल्याणमध्ये सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. महात्मा फुले पोलिसांनीही (Mahatma Phule Police) कारवाई केली आहे. रिजवान शेख व महंमद कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात 17 गुन्हे दाखल आहेत . पोलिसांनी या आरोपी कडून 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चार  मोटारसायकल अश्या प्रकारे 6 लाख 90 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला करत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांकडे सोनसाखळी चोरीच्या घटनांच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज (CCTV)व आपल्या गुप्त माहितीदारा कडून माहिती काढात आठ दिवसात रिजवान शेख व महंमद कुरेशी नावाच्या दोन सराईत चोरट्याना सापळा रचून ताब्यात घेतले .

नेमकं काय घडलं

कल्याण रामबाग परिसरात राहणाऱ्या 49 वर्षीय महिला पहाटे पायी जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी मोटारसायकलवरून तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली. याबाबत 11 जून रोजी कल्याण महात्मा फुले पोलीस चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कल्याण महात्मा फुले पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले . त्याच्या आधारे आपल्या गुप्त माहितीदाराकडून माहिती काढली व आठ दिवसात रिजवान शेख व महंमद कुरेशी नावाच्या दोन सराईत चोरट्याना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी एक दोन नाहीतर तब्बल दहा गुन्हे केल्याची कबुली दिली. यात महात्मा फुले पोलीस ठाण्यात 5 , बाजारपेठ पोलीस ठाण्यात 2 , मुंब्रा मालवण व वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 असे एकूण दहा गुन्ह्याची कबुली दिली.

दोघेही सराईत गुन्हेगार

पोलिसांच्या माहितीनुसार हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात 17 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. हे दोन्ही आरोपी मुंबईमध्ये एका खाजगी कंपनीत काम करतात मौजमस्तीसाठी चोरी करायचे. विशेष म्हणजे पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून पहिले हे चोर मोटर सायकल चोरी करायचे . त्यानंतर चोरीच्या मोटरसायकलीवरून इतर परिसरात पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या वस्तू धूम स्टाईल ने उडवायचे. सध्या या चोरट्यांकडून कल्याण महात्मा फुले पोलिसांनी 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चार मोटारसायकल असे 6 लाख 90 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत या दोघांनी अजून किती ठिकाणी चोरी केली आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा