Raigad Oil leaked : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर रासायनिक ऑईल टँकर लीक, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला

क्षमतेपेक्षा अधिक ऑईल भरल्याने घाटात ते सांडू लागल्याने पोलिसांनी दुसरा टँकर मागवून त्यात भरण्यास सांगितल्याने पुढील अनर्थ टळला आहे. गॅस्केट व्यवस्थित न बसवल्याने त्यामधून ऑईल लिकेज होत होते. माहिती कळताच या ठिकाणी खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस व सर्व सुरक्षा यंत्रणा दाखल झाल्या.

Raigad Oil leaked : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर रासायनिक ऑईल टँकर लीक, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर रासायनिक ऑईल टँकर लीक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 13, 2022 | 6:02 PM

रायगड / संतोष दळवी (प्रतिनिधी) : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली पोलिस स्टेशन हद्दीत 37 किलोमीटर अंतरावर रासायनिक ऑईल घेऊन जाणाऱ्या टँकर (Tanker)मधून ऑईल लीक (Oil Leaked) झाले. पोलिसांनी त्याला तातडीने थांबवून टँकर रस्त्याच्या एका साईडला घेतला. यामुळे रस्त्यावर ऑईल सांडण्यापासून वाचलं अन्यथा रस्त्यावर ऑईल सांडून गाड्यांचे अपघात (Accident) घडण्यापासून वाचला. क्षमतेपेक्षा अधिक ऑईल भरल्याने घाटात ते सांडू लागल्याने पोलिसांनी दुसरा टँकर मागवून त्यात भरण्यास सांगितल्याने पुढील अनर्थ टळला आहे. गॅस्केट व्यवस्थित न बसवल्याने त्यामधून ऑईल लिकेज होत होते. माहिती कळताच या ठिकाणी खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस व सर्व सुरक्षा यंत्रणा दाखल झाल्या. सदर टँकरच्या चालकाला सर्व गॅस किट टाइट करून घेण्यासाठी सूचना पोलिसांनी दिल्याने सध्याला कोणताही धोका नाही.

ट्रक भाड्याने घेऊन विकणाऱ्या चालकास पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मालवाहू ट्रक भाड्याने घेत, त्या ट्रकला माॉडीफाय करून दुसऱ्यालाच विकल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल शहरात उघडकीस आला आहे. याबाबत ट्रक मालकाने पनवेल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार पनवेल पोलिसांनी ट्रक आणि आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी ट्रकसह आरोपी चालकास ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून विकलेला ट्रक हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चालकावर अनेक गुन्हे दाखल आहे. ज्या पोलीस स्थानकात गुन्हे दाखल आहेत तिकडे देखील या आरोपीस लवकरात लवकर सोपवण्यात येईल, अशी अधिक माहिती पनवेल पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.