
नवी दिल्ली : पत्नीवर अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करणाऱ्या एका बिझनेसमनला कोर्टाने चांगलाच धडा शिकवला आहे. जलदगती न्यायालयाने या बिझनेसमनला नऊ वर्ष सश्रम कारावाची शिक्षा ठोठावलीय. छत्तीसगड येथील न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. भिलाई-दुर्ग येथील हा बिझनेसमन आहे. लग्नानंतर 2007 पासून महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु झाला. नवरा तिच्यावर अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करायचा. हुंड्यासाठी सुद्धा तिचा छळ सुरु होता.
या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने नवऱ्याच घर सोडलं. सिंगल मदर म्हणून तिने मुलीला मोठ करण्याचा निर्णय घेतला. 2016 साली मुलीला घेऊन ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली. 7 मे 2016 रोजी सुपेला पोलीस ठाण्यात नवऱ्याविरोधात तक्रार नोंदवली. नवऱ्याविरोधात आयपीसी सेक्शन 377 अनैसर्गिक शरीरसंबंध, 498 अ हुंड्यासाठी छळ या कलमातंर्गत नवरा आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात तक्रार नोंदवली.
नवऱ्याच्या आई-वडिलांना काय शिक्षा सुनावली?
“गुन्ह्याच स्वरुप लक्षात घेता, आरोपीला कुठलीही सवलत देण न्याय ठरणार नाही” असं कोर्टाने आदेशात म्हटलं आहे. आयपीसीच्या कलम 377 गुन्हा शिक्षेस पात्र आहे. सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावताना 1000 रुपये दंड ठोठावला. याच आरोपाखाली आरोपीच्या पालकांना 10 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय.