IND vs SA : इतकं जबरदस्त खेळूनही हार्दिक पांड्यावर अन्याय का? दक्षिण आफ्रिकेच्या कोचच स्पष्ट मत
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी 20 सीरीज काल संपली. भारताने ही मालिका 3-1 ने जिंकली. दोन टीममधला मोठा फरक ठरला तो म्हणजे हार्दिक पांड्या. त्याची कामगिरीच सर्वकाही सांगून जाते. पण असं असूनही एका बाबतीत त्याच्यावर अन्याय झालाय असं वाटू शकतं.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी 20 सीरीजमध्ये हार्दिक पांड्याने जबरदस्त प्रदर्शन केलं. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही मालिका 3-1 ने जिंकली. यात हार्दिक पांड्याच महत्वाचं योगदान आहे. त्याने आफ्रिकी गोलंदाजांना आपल्या बॅटचा तडाखा दाखवून दिला. हार्दिक पांड्या ऑलराऊंडर आहे. तो उत्तम फलंदाजीबरोबर गोलंदाजी सुद्धा करु शकतो. त्याने चार सामन्यात 142 धावा फटकावल्या. सोबतच तीन विकेटही काढले. दक्षिण आफ्रिकेच्या टीमचे कोच शुक्री कॉनराड हार्दिकचा खेळ पाहून म्हणालेले की, “या परफॉर्मन्सनंतर हार्दिकला प्लेयर ऑफ द सीरीज म्हणजे मालिकावीराचा पुरस्कार मिळाला नाही, तर मला आश्चर्य वाटेल आणि झालं सुद्धा तसचं” इतकं चांगला खेळूनही हार्दिकची प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्कारासाठी निवड झाली नाही. टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत-दक्षिण आफ्रिकेमधील पाचवा टी 20 सामना झाला. हार्दिकने अखेरच्या सामन्यात स्फोटक फलंदाजी केली. त्याने अवघ्या 25 चेंडूत 63 धावा तडकावल्या. यात पाच फोर आणि पाच सिक्स होते. 252 च्या स्ट्राइक रेटने त्याने धावा केल्या. यात त्याने डेवाल्ड ब्रेव्हिसचा महत्वाचा विकेट काढला. त्यावेळी ब्रेव्हिस जबरदस्त बॅटिंग करत होता.
माझ्या मते हार्दिक दोन टीममधला फरक आहे
शुक्री कॉनराड यांच्या मते दोन टीममधला मोठा फरक म्हणजे हार्दिक पांड्या. जसप्रीत बुमराहपेक्षा पण जास्त छाप बुमराहने उमटवली, असं कॉनराड यांचं मत आहे. “माझ्या मते हार्दिक दोन टीममधला फरक आहे. आज रात्री त्याने केलेलं प्रदर्शन हा विजय आणि पराजय यामधला फरक आहे. पहिल्या सामन्यातही तो असाच खेळला होता” असं कॉनराड सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाले. “या फॉर्मेटमध्ये तो वर्ल्डमधला बेस्ट प्लेयर का आहे, त्याला कारण आहे. त्याचं प्रदर्शन तसं आहे. कोण मॅन ऑफ द सीरीज झाला मला माहित नाही. पण तो हार्दिक नसेल, तर मला आश्चर्य वाटेल. हार्दिक हा दोन टीममधला फरक आहे” असं दक्षिण आफ्रिकेच्या टीमचे कोच शुक्री कॉनराड म्हणाले.
100 विकेट पूर्ण करणारा तो तिसरा गोलंदाज
मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या टीम इंडियाची मोठी संपत्ती आहे. कारण आपल्या गोलंदाजीने तो विकेट सुद्धा मिळवून देऊ शकतो. या सीरीजमध्ये अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह यांच्यानंतर टी 20 फॉर्मेटमध्ये 100 विकेट पूर्ण करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला.
