VIDEO | शरणागतीच्या तयारीतील 13 वर्षीय तरुणाची गोळी झाडून हत्या, Chicago पोलिसांचा क्रूर चेहरा उघड

| Updated on: Apr 16, 2021 | 2:47 PM

अ‍ॅडमच्या हातात बंदूक असल्यामुळे त्याच्यावर गोळी झाडल्याचा दावा शिकागो पोलिसांनी केला होता. (Chicago Police shooting Adam Toledo)

VIDEO | शरणागतीच्या तयारीतील 13 वर्षीय तरुणाची गोळी झाडून हत्या, Chicago पोलिसांचा क्रूर चेहरा उघड
शिकागो पोलिसांनी केलेल्या कारवाईचा व्हिडीओ
Follow us on

शिकागो : अमेरिकेतील शिकागो पोलिसांनी कथित बंदुकधारी तरुणाची गोळी झाडून केलेल्या हत्येचा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. 13 वर्षीय तरुण अ‍ॅडम टोलेडो (Adam Toledo) पोलिसांना शरण जाण्याच्या तयारीत होता, मात्र तितक्यात त्याच्यावर गोळी झाडण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या बॉडी कॅमेरामध्ये हा व्हिडीओ कैद झाला आहे. (Chicago Police fatally shooting 13 year old Adam Toledo Video Footage revealed)

अ‍ॅडम टोलेडोच्या मृत्यूनंतर शिकागोतील नागरिकांनी पोलिसांविरोधात निदर्शनं केली होती. अ‍ॅडम पोलिसांशी वाटाघाटी करण्यास तयार असतानाही त्याला गोळी घातल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मानवाधिकार संघटनांनीही पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. एरिक स्टिलमॅन (Eric Stillman) नावाच्या 34 वर्षीय पोलीस अधिकाऱ्याने अ‍ॅडमवर गोळी झाडली होती. 29 मार्च 2021 च्या पहाटे ही घटना घडली होती.

शरणागती पत्करण्याची अ‍ॅडमची तयारी

अ‍ॅडमच्या हातात बंदूक असल्यामुळे त्याच्यावर गोळी झाडल्याचा दावा शिकागो पोलिसांनी केला होता. मात्र अ‍ॅडम पोलिसांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या तयारीत असतानाही त्याच्यावर गोळीबार केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस जाणीवपूर्वक सामान्य नागरिकांना टार्गेट करत आहे, असा दावा पीडित कुटुंबाच्या वकिलांनी केला आहे.

पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

न्यूयॉर्क टाइम्सने पोलिसांच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मयत अ‍ॅडमच्या हातात बंदूकसदृश्य वस्तू होती. मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला सरेंडर होण्यास सांगताच, त्याने ती फेकून दिली होती, असं न्यूयॉर्क टाइम्सने या घटनेशी संबंधित 21 व्हिडीओंचे विश्लेषण करुन तयार केलेल्या अहवालात म्हटलं आहे.

व्हिडीओतील दृश्य तुमचे लक्ष विचलित करु शकतात

अ‍ॅडमच्या हातात बंदूक नव्हती. मग त्याच्यावर गोळी का झाडली गेली, असा सवालही पीडित कुटुंबाच्या वकिलांनी विचारला आहे.

संबंधित बातम्या :

Fact Check | मॉलबाहेर पोलिसाचा दाम्पत्यावर गोळीबार, व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?