उल्हासनगरात दोन उद्योगपतींमध्ये हाणामारी, कारण ऐकून तुम्ही अवाक् व्हाल !

संजय गुप्ता यांचे उल्हासनगर कॅम्प 4 मध्ये ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये गुप्ता शनिवारी 10 सप्टेंबर रोजी दुपारी बसले होते. यावेळी मुकेश वाधवा हे तेथे आले आणि त्यांनी रोशन नावाच्या तरुणाशी वाद घातला.

उल्हासनगरात दोन उद्योगपतींमध्ये हाणामारी, कारण ऐकून तुम्ही अवाक् व्हाल !
उल्हासनगरात पार्किंगचा वाद टोकाला गेला
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 6:02 PM

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये पार्किंग (Parking)वरुन झालेल्या क्षुल्लक वादातून दोन उद्योगपतींमध्ये हाणामारी (Fighting) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना तेथील सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संजय गुप्ता आणि मुकेश वाधवा अशी हाणामारी करणाऱ्या दोघा उद्योगपतींची नावे आहेत.

मुकेश वाधवा आणि एका तरुणामध्ये सुरु होता वाद

संजय गुप्ता यांचे उल्हासनगर कॅम्प 4 मध्ये ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये गुप्ता शनिवारी 10 सप्टेंबर रोजी दुपारी बसले होते. यावेळी मुकेश वाधवा हे तेथे आले आणि त्यांनी रोशन नावाच्या तरुणाशी वाद घातला.

दोन्ही उद्योजकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

यावेळी संजय गुप्ता हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता मुकेश वाधवा यांनी त्यांना मारहाण केली, असा गुप्ता यांचा आरोप आहे. तर गुप्ता यांच्या कारखान्यातील कामगारांनी मुकेश वाधवा आणि त्यांच्या साथीदारांना मारहाण केली, असा वाधवा यांचा आरोप आहे.

विठ्ठलवाडी पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल

मारहाणीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. नेमकी कुणाची चूक झाली हे तपासाअंतीच स्पष्ट होईल.