Sangli Beating : सुरक्षारक्षकाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सांगलीतील विलिंगडन कॉलेजमधील बीसीएसच्या दुसऱ्या वर्गातील परिक्षा झाल्यावर विद्यार्थी घरी जात असताना गाड्याजवळ सेल्फी काढत होते. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना सिक्युरिटी गार्ड यांनी काठीने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.

Sangli Beating : सुरक्षारक्षकाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सांगलीत सुरक्षारक्षकाकडून विद्यार्थ्यांंना मारहाण
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 18, 2023 | 10:17 PM

सांगली : शहरातील विलिंगडन कॉलेजमध्ये सिक्युरिटी गार्डकडून विद्यार्थ्यांना लाठीने बेदम मारहाण केल्याची घटना सांगलीत घडली आहे. त्यानंतर पाठलाग करून घरात जाऊन पुन्हा मारहाण केली. याप्रकरणी चार सिक्युरिटी गार्डवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निष्पाप विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्याच्या धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. सिक्युरिटी गार्डकडून विनाकारण विद्यार्थ्यांना लाठीने बेदम मारहाण करण्यात आली आहे.

विद्यार्थी गाड्याजवळ सेल्फी काढत येते

सांगलीतील विलिंगडन कॉलेजमधील बीसीएसच्या दुसऱ्या वर्गातील परिक्षा झाल्यावर विद्यार्थी घरी जात असताना गाड्याजवळ सेल्फी काढत होते. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना सिक्युरिटी गार्ड यांनी काठीने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.

पाठलाग करुन जबर मारहाण

डोक्यावर, खांद्यावर पाठीवर बेदम मारहाण केली. विद्यार्थी घाबरून घराकडे पळून गेले तर सिक्युरिटी गार्डनी विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांच्या घरापर्यंत जाऊन पुन्हा त्यांना जबर मारहाण केली.

सिक्युरिटी गार्डने पियुश दीपक जाधव आणि प्रणित या मुलांना घराजवळ जाऊन जबर पुन्हा मारहाण करून जखमी केले आहे. याबाबत विलिंगडन कॉलेजच्या सूरज सूर्यवंशी, सोनल आणि अन्य दोन सेक्युरिटी गार्ड यांच्या विरोधात संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थ्यांना पाठलाग करून अमानुष मारणे, शिव्या देणे, धमकी अशा प्रकारचे संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या मारहाणीने पालक वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहेत.