बोठेच्या जामीनावरील सुनावणीत ‘हनीट्रॅप’चा उल्लेख, बोठे गजाआड की बाहेर? निर्णयाकडे लक्ष

| Updated on: Dec 15, 2020 | 6:06 PM

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. कारण न्यायालयानं बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे.

बोठेच्या जामीनावरील सुनावणीत हनीट्रॅपचा उल्लेख, बोठे गजाआड की बाहेर? निर्णयाकडे लक्ष
Rekha Jare Murder Case
Follow us on

अहमदनगर : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. कारण न्यायालयानं बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. आज या जामीन अर्जावर सुनावणी झाली. ज्यामध्ये दोन्ही बाजूनं युक्तीवाद झाला. त्यामुळं आता ही सुनावणी बुधवारी (16 डिसेंबरला) होणार आहे. (Court has reserved judgment on Bal Bothe pre arrest bail application)

बाळ बोठेंच्या वकीलांच्या युक्तीवादात हनी ट्रॅप!

बाळ बोठेंचे वकील महेश तवले यांनी आज युक्तीवाद केला. ज्यामध्ये त्यांनी या प्रकरणाचा हनी ट्रॅपशी संबंध जोडला. मात्र, इथं त्यांनी हनी ट्रॅपचा बाळ बोठेला फसवण्यात वापर केल्याचा उल्लेख अॅड. तवलेंनी केला. बाळ बोठे पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी वृत्तपत्रात हनीट्रॅपची मालिका चालवली. या वृत्तमालिकेत त्यांनी सागर भिंगारदिवेचं नाव घेतलं. सागर भिंगारदिवे हाच हनीट्रॅपचा मास्टरमाईंड असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्यामुळंच त्यांना या प्रकरणात फसवण्यात आल्याचा युक्तीवाद अॅड. महेश तवलेंकडून करण्यात आला.

हनीट्रॅपमुळं फसवलं, मग बाळ बोठे भिंगारदिवेमध्ये बैठका का?- सरकारी वकील

हनीट्रॅपमधून जर बाळ बोठेला फसवण्यात आलं असेल तर मग तो सागर भिंगारदिवे आणि बाळ बोठेमध्ये इतक्या बैठका का झाल्या? बाळ बोठे भिंगारदिवेशी सतत फोनवर का बोलत होता? हत्याकांडाचा आणि कॉल डिटेल कशा जुळतात? आणि रेखा जरेंनी लिहलेल्या पत्रात बाळ बोठेचा उल्लेख कसा? असे प्रश्न विचारत सरकारी वकील सतीष पाटील यांनी तवलेंचा युक्तीवाद खोडून काढला.
हनीट्रॅपबाबत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. हॅनीट्रॅपची पोलिसांनी चौकशीही केलेली नाही. त्यामुळं हत्याकांडाचा आणि हनीट्रॅपचा काहीही संबंध नसल्याचा दावा पाटील यांनी केला.

कुणाल जरेच्या जबाब महत्त्वाचा!

रेखा जरेंचा मुलगा कुणाल जरे याचा जबाब सुनावणीत महत्त्वाचा ठरला. शिवाय प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विजयमाला माने यांच्या जबाबातही बाळ बोठेचाच उल्लेख करण्यात आला आहे. यामुळं आजच्या युक्तीवादात या दोघांचे जबाबही महत्त्वाचे ठरले. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. उद्या (16 डिसेंबर) न्यायालय याबाबत आपल्या निर्णय देणार आहे. त्यातूनच कळेल की बाळ बोठे जामीनावर बाहेर सुटणार की गजाआड जाणार…??

(Court has reserved judgment on Bal Bothe pre arrest bail application)

संबंधित बातम्या

Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

जरे यांच्या घरात बोठेविरुद्ध लिहिलेले पत्र सापडलं; मोठा खुलासा होण्याची शक्यता