चार अल्पवयीन मुलांनी गाठलं, 65 वर्षीय महिलेवर रेल्वे क्रॉसिंगजवळ गँगरेप

मध्य प्रदेशातील सिंगरौली भागात जयंत पोलिस चौकी अंतर्गत येणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगवर शनिवारी रात्री हा घृणास्पद प्रकार घडला. पीडिता आपल्या बहिणीकडून घरी येत असताना सामूहिक बलात्काराची घटना घडली

चार अल्पवयीन मुलांनी गाठलं, 65 वर्षीय महिलेवर रेल्वे क्रॉसिंगजवळ गँगरेप
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 12:23 PM

भोपाळ : मध्य प्रदेशात वासनांधतेचा कळस पाहायला मिळाला. रेल्वे क्रॉसिंगवरुन घरी जाणाऱ्या वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे 65 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पाच आरोपींपैकी चौघे जण अल्पवयीन आहेत.

नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशातील सिंगरौली भागात जयंत पोलिस चौकी अंतर्गत येणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगवर शनिवारी रात्री हा घृणास्पद प्रकार घडला. पीडिता आपल्या बहिणीकडून घरी येत असताना सामूहिक बलात्काराची घटना घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेने पोलीस स्टेशन गाठून आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली.

संशयास्पद अवस्थेत फिरताना दोघे ताब्यात

पोलिसांनी पाच जणांविरोधात सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली. पीडितेने केलेल्या वर्णनाच्या आधारे आरोपींची शोधाशोध करण्यात आली. घटनास्थळाजवळ दोन अल्पवयीन आरोपींना संशयास्पद अवस्थेत काही जणांनी पाहिले. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. पीडितेने त्या दोघांची ओळख पटवली. त्यानंतर दोघांनी उर्वरित तीन आरोपींची नावं सांगितली.

घटनेच्या वेळी आरोपींकडून अंमली पदार्थांचं सेवन

पाचपैकी चार आरोपी अल्पवयीन आहेत, तर पाचवा 24 वर्षांचा आहे. सर्व जण रेल्वे क्रॉसिंग परिसरात राहत असून त्यांना अनेकदा तिथे फिरताना पाहिलं गेलंय. घटनेच्या वेळी आरोपींनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं, असा दावा केला जातो.

दिल्लीत वृद्धेची बलात्कारानंतर हत्या

दरम्यान, 62 वर्षीय भाजी विक्रेत्या महिलेवर बलात्कार करुन हत्या करणाऱ्या तरुणाला दिल्ली पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. 30 वर्षीय आरोपी विपीन डेढा याला घटनेच्या 24 तासांतच न्यू अशोक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. पीडित महिला आरोपीच्या परिचयातील होती. त्यामुळे बलात्काराबाबत वाच्यता करण्याच्या भीतीनेच विपीनने वृद्धेची चाकूने भोसकून हत्या केली होती.

संबंधित बातम्या :

62 वर्षीय भाजी विक्रेतीची बलात्कारानंतर हत्या, 30 वर्षीय आरोपीला अटक

Actress Molestation | इंटिरिअर डिझायनरकडून विनयभंग, मुंबईतील अभिनेत्रीचा आरोप

अल्पवयीन मुलीचा सासरी नांदण्यास नकार, कोल्हापुरात बापाने लेकीला नदीत ढकललं