Actress Molestation | इंटिरिअर डिझायनरकडून विनयभंग, मुंबईतील अभिनेत्रीचा आरोप

मुंबईत कार्यरत असलेल्या संबंधित अभिनेत्रीच्या विनयभंगाच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीच्या फ्लॅटमध्ये इंटिरिअरचे काम करणाऱ्या डिझायनरने आपला विनयभंग केल्याचा दावा तिने केला आहे.

Actress Molestation | इंटिरिअर डिझायनरकडून विनयभंग, मुंबईतील अभिनेत्रीचा आरोप
इंटिरिअर डिझायनरवर अभिनेत्रीचा आरोप

मुंबई : इंटिरिअर डिझायनरने विनयभंग केल्याचा आरोप मुंबईतील अभिनेत्रीने केला आहे. फ्लॅटमधील कामावरुन वाद झाल्यानंतर आरोपीने आपला विनयभंग केल्याचा दावा महिलेने केला आहे. या प्रकरणी मुंबईतील ओशिवारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

काय आहे प्रकरण?

मुंबईत कार्यरत असलेल्या संबंधित अभिनेत्रीच्या विनयभंगाच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीच्या फ्लॅटमध्ये इंटिरिअरचे काम करणाऱ्या डिझायनरने आपला विनयभंग केल्याचा दावा तिने केला आहे. आपल्या अपार्टमेंटमध्ये केलेल्या अंतर्गत सजावटीच्या कामावरुन त्याच्याशी झालेल्या भांडणानंतर त्याने विनयभंग केला, असा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी मुंबईतील ओशिवारा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु कोणालाही बेड्या ठोकण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

अभिनेत्रींच्या विनयभंगाचे प्रकार याआधीही मुंबईत

दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुंबईत विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. गाडी अडवून मद्यपीने अभिनेत्रीला धक्काबुक्की केल्याचा आरोप झाला होता. यानंतर विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपीने दारु पिऊन आपली गाडी तक्रारदार अभिनेत्रीच्या गाडीसमोर उभी केली होती. त्यानंतर अभिनेत्रीने त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. मात्र याचा राग अनावर झाल्यामुळे आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या :

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मुंबईत धक्काबुक्की, विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक

Vijay Raaz Case | विनयभंगाची तक्रार, अभिनेता विजय राज यांना बॉम्बे हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI