प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मुंबईत धक्काबुक्की, विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक

आरोपीने अभिनेत्रीला शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. (Marathi Actress Molestation in Goregaon)

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मुंबईत धक्काबुक्की, विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक
मुंबई मराठी चित्रपट अभिनेत्रीचा विनयभंग

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुंबईत विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गाडी अडवून मद्यपीने अभिनेत्रीला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Marathi Actress Molestation in Goregaon)

दारु पिऊन अभिनेत्रीच्या गाडीसमोर पार्किंग

आरोपीने दारु पिऊन आपली गाडी तक्रारदार अभिनेत्रीच्या गाडीसमोर उभी केली होती. त्यानंतर अभिनेत्रीने त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. मात्र याचा राग अनावर झाल्यामुळे आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.

गोरेगावमधून आरोपीला बेड्या

मुंबईतल्या गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याची माहिती आहे. शुक्रवारी रात्री ही घटना गोरेगावच्या जैन हॉस्पिटलच्या गल्लीत मंथन हॉटेलजवळ घडली. या प्रकरणी गोरेगावमधून प्रितम वर्मा या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

अभिनेत्री वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी

दरम्यान, तक्रारदार अभिनेत्रीने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत. छोट्या पडद्यावर काही मालिका आणि टीव्ही शोही केले आहेत. तक्रारदार अभिनेत्री एका वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी आहे.

कारभारी लयभारी फेम अभिनेत्रीला मारहाण

झी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या कारभारी लयभारी या मालिकेतील अभिनेत्री गंगा (प्रणित हाते) हिने आपल्याला भर रस्त्यात मारहाण झाल्याचा आरोप केला होता. मालिकेतील सुरुवातीच्या काही भागात शोना मॅडमसोबत गंगा झळकली होती. आपल्या अभिनयाने वेगळी छाप पाडणाऱ्या गंगाला नुकताच भयावह अनुभवाचा सामना करावा लागला. गंगाने स्वतः इन्स्टाग्राम व्हिडीओद्वारे ही माहिती दिली होती.

बसस्टॉपवर तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप

गंगाच्या म्हणण्यानुसार ती मुंबईतील एका बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती. तितक्यात काही मुलांनी विनाकारण तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती घाबरून गेली आणि तिने तिथून रिक्षाने घराची वाट धरली. रिक्षातूनच तिने लाईव्ह येत घाबरलेल्या अवस्थेत पुढे काय करावे, अशी विचारणा चाहत्यांना केली होती. (Marathi Actress Molestation in Goregaon)

संबंधित बातम्या :

फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन…

‘माझ्या नवऱ्याची बायको’मधला ‘हा’ अभिनेता साकारणार ‘बबड्या’ची भूमिका!

(Marathi Actress Molestation in Goregaon)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI