नंबरप्लेटवरील तापदायक अक्षरं बदलणार, दिल्लीच्या स्कूटीगर्लची महिला आयोगाकडून दखल, परिवहन विभागाला नोटीस

| Updated on: Dec 05, 2021 | 10:09 AM

S.E.X या सीरीजमध्ये किती वाहनांना नोंदणी क्रमांक देण्यात आला, याची माहिती उत्तरात द्यावी असंही महिला आयोगाने परिवहन विभागाला बजावलेल्या नोटिशीत म्हटलं आहे. मात्र हा प्रकार समोर आल्यानंतर ही सीरीज थांबवण्यात आली, असं वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी स्पष्ट केलं.

नंबरप्लेटवरील तापदायक अक्षरं बदलणार, दिल्लीच्या स्कूटीगर्लची महिला आयोगाकडून दखल, परिवहन विभागाला नोटीस
नंबर प्लेटवरील अक्षरं तरुणीला ताप देणारी ठरत आहेत
Follow us on

नवी दिल्ली : S.E.X ही तीन अक्षरं असलेली नंबरप्लेट मिळाल्यानंतर लाजिरवाण्या अनुभवांना सामोरे जाणाऱ्या दिल्लीतील तरुणीची कहाणी सोशल मीडियावर अल्पावधीतच व्हायरल झाली. या प्रकरणाची दिल्ली महिला आयोगाने तातडीने दखल घेत परिवहन विभागाला नोटीस बजावली आहे. ‘सेक्स’ अशी अक्षरे आल्याने टीका-टिपण्ण्यांचा सामना करावा लागत असलेल्या तरुणीच्या दुचाकीचा नोंदणी क्रमांक बदलण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

S.E.X या सीरीजमध्ये किती वाहनांना नोंदणी क्रमांक देण्यात आला, याची माहिती उत्तरात द्यावी असंही महिला आयोगाने परिवहन विभागाला बजावलेल्या नोटिशीत म्हटलं आहे. मात्र हा प्रकार समोर आल्यानंतर ही सीरीज थांबवण्यात आली, असं वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी स्पष्ट केलं.

महिला आयोगाचं म्हणणं काय?

“लोक इतके निष्ठुर आणि बिनडोक कसे असू शकतात, की एका तरुणीला नाहक इतका त्रास सहन करावा लागत आहे, हे खूप दुर्दैवी आहे. तिला यापुढे आणखी त्रास होऊ नये म्हणून मी वाहतूक विभागाला हा प्रश्न सोडवण्यासाठी चार दिवसांचा वेळ दिला आहे,” असे महिला आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे. DCW प्रमुख स्वाती मालीवाल यांनी हे पत्र लिहिले आहे. वाहतूक विभागाकडे अशा स्वरुपातील किती तक्रारी आल्या, त्याची माहितीही मालीवाल यांनी मागवली आहे.

दिल्लीत दुचाकींसाठी ‘S’ हे अक्षर वापरले जाते. सध्या नोंदणीसाठी वापल्या जाणाऱ्या सीरीजमध्ये ‘E’ आणि ‘X’ ही अक्षरं लागोपाठ येतात. त्यामुळे नंबरप्लेटवर S.E.X ही तीन अक्षरं सलग आली आहेत.

काय आहे प्रकरण?

राजधानी दिल्लीतील (Delhi) एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर पेचप्रसंग उभा राहिला होता. मुलीचं नाव आपण प्रीती असं समजूयात. प्रीती ही दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वसामान्य मुलगी आहे. तुमच्या-आमच्या प्रमाणेच स्वतःची दुचाकी असल्याची स्वप्नं उराशी बाळगणारी एखादी गर्ल नेक्स्ट डोअर. मागच्या महिन्यात प्रीतीचा वाढदिवस होता, तिने वडिलांकडे वाढदिवसाची भेट म्हणून स्कूटी मागितली. प्रीती आता कॉलेजला जात असल्याने तिच्या वडिलांनी स्वखर्चाने दिल्लीतील एका शोरुममधून तिच्यासाठी स्कूटी बुक केली. आत्तापर्यंत सगळं काही सुरळीत सुरु होतं. मात्र प्रीतीच्या टूव्हीलरच्या क्रमांकावरुन त्रास सुरु झाला.

S.E.X या तीन अक्षरांमुळे गोंधळ

खरं तर, प्रीतीच्या वाहनाला आरटीओकडून मिळालेला क्रमांक काहीसा विचित्र निघाला. क्रमांकाच्या मध्यभागी S.E.X ही तीन अक्षरं येतात. खरं तर या शब्दात काहीच वावगं नाही. मात्र सेक्ससारखा शब्द ऐकला किंवा वाचला की अनेकांचे कान टवकारतात, डोळे वटारतात. अशा प्रसंगात तर सगळेच खिल्ली उडवत हसायला मागे-पुढे पाहत नाहीत.

अनोळखी लोकांकडूनही चिडवाचिडवी

गाडीवर नंबर प्लेट लावायला गेलेल्या प्रीतीच्या भावाला हे तीन शब्द आपल्या कुटुंबाच्या अडचणी वाढवणारे ठरतील, याची जराशीही कल्पना नव्हती. वाहनाच्या नंबर प्लेटवर असलेली S.E.X ही अक्षरे अनेकांना माना वळवून पाहायला लावत होती. वाटेत येणारे-जाणारे, ओळखीचेच काय, अनोळखी लोकही प्रीतीच्या भावावर शेरेबाजी करु लागले.

प्रीतीसाठी लाजिरवाणा क्षण

घरी परतल्यानंतर प्रीतीच्या भावाने हा सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. हे ऐकून प्रीतीही घाबरली. त्यानंतर प्रीतीने वडिलांना गाडीचा नंबर बदलण्यास सांगितले. यासंदर्भात दिल्लीच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी, या मालिकेतील सुमारे दहा हजार वाहनांना हा क्रमांक देण्यात आल्याचं सांगितले. लोकांचे टोमणे टाळण्यासाठी प्रीतीला घराबाहेर पडणेही नकोसे झाले होते.

संबंधित बातम्या :

स्कूटीच्या नंबरप्लेटवरील तीन अक्षरं ठरतायत तापदायक, तरुणीला घराबाहेर पडणंही झालंय लाजिरवाणं