न्यायालयाच्या आवारात पती-पत्नीमध्ये फ्रीस्टाईल !, घटनेत पती जखमी

पती-पत्नीमध्ये गेल्या सहा वर्षापासून कौटुंबिक वाद सुरु आहेत. सहा वर्षापासून पती न्यायायलयात हजर राहत नव्हता. यामुळे पत्नी आर्थिक अडचणीत होती.

न्यायालयाच्या आवारात पती-पत्नीमध्ये फ्रीस्टाईल !, घटनेत पती जखमी
कल्याण-डोंबिवलीमध्‍ये अंधश्रध्देचा कळस
Image Credit source: Google
| Updated on: Nov 17, 2022 | 3:40 PM

जळगाव : कौटुंबिक वादातून न्यायालयाच्या आवारातच पती-पत्नीमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना जळगाव जिल्हा न्यायालयात घडली आहे. या घटनेत पती जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

सहा वर्षांपासून सुरु आहे वाद

पती-पत्नीमध्ये गेल्या सहा वर्षापासून कौटुंबिक वाद सुरु आहेत. सहा वर्षापासून पती न्यायायलयात हजर राहत नव्हता. यामुळे पत्नी आर्थिक अडचणीत होती.

जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी महिला आली असता तिला तेथे पती दिसला. तिने आपल्या पतीला न्यायालयात पकडल्याने दोन्ही परिवारांमध्ये तुफान हाणामारी झाली.

हाणामारीत पती गंभीर जखमी

यावेळी न्यायालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी धाव घेत सर्वांना शांत केले. या घटनेमुळे न्यायालयात खळबळ उडाली आहे. या हाणामारीत पती गंभीर जखमी झाला.

काय आहे प्रकरण?

महिलेने जळगाव जिल्हा न्यायालयात पोटगी मिळावी म्हणून खटला दाखल केला आहे. मात्र पती सहा वर्षापासून या खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहत होता.

खटल्याच्या सुनावणीची आज तारीख होती. यासाठी महिला आपल्या नातेवाईकांसह न्यायालयात सुनावणीसाठी आली होती. यावेळी तिला तिचा पतीही आल्याचे दिसले आणि तिने त्याला पकडले. यानंतर न्यायालयाच्या आवारात दोघांच्या नातेवाईकांमध्ये तुफान राडा झाला.