AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मटण सूपमध्ये भात आढळला, संतापलेल्या तरुणांनी जे केले त्याने पुणे हादरले !

ही घटना सीसीटीव्हीत ही कैद झाली आहे. त्याच आधारे सांगवी पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत.

मटण सूपमध्ये भात आढळला, संतापलेल्या तरुणांनी जे केले त्याने पुणे हादरले !
क्षुल्लक कारणातून हॉटेलमधील वेटरची हत्याImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Nov 17, 2022 | 3:53 PM
Share

पुणे : हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या मटण सूपमध्ये भात आढळल्याने संतापलेल्या दोन तरुणांनी वेटरची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. या घटनेत हॉटेलमधील अन्य दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी आरोपींविरेधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका आरोपी ओळख पटली

आरोपींपैकी एकाची ओळख पटली असून, विजय वाघिरे असे त्याचे नाव आहे. तर दुसऱ्या आरोपीची ओळख अद्याप पटली नाही. मंगेश पोस्ते असे हत्या करण्यात आलेल्या 19 वर्षीय वेटरचे नाव आहे. तर अजित मुटकुळे आणि सचिन भवर अशी जखमींची नावं आहेत.

दोघे आरोपी हॉटेलमध्ये जेवायला गेले होते

विजय वाघिरे हा आपल्या मित्रासोबत पिंपळ सौदागर परिसरातील सासुरवाडी हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. यावेळी दोघेही आरोपी दारुच्या नशेत होते. दोघांनी मटण सूप ऑर्डर केले. मटण सूप आल्यानंतर त्यामध्ये भात आढळला.

मटण सूपमध्ये तांदूळ आढळल्याने कर्मचाऱ्यांना मारहाण

मटण सूपमध्ये तांदूळ आढळल्यानंतर दोघेही आरोपी चिडले आणि हॉटेल कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. विजय वाघेरे आणि त्याच्या साथीदाराने या हॉटेलमधील तीन कर्मचाऱ्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी वेटर मंगेश पोस्टेच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटना सीसीटीव्हीत कैद

ही घटना सीसीटीव्हीत ही कैद झाली आहे. त्याच आधारे सांगवी पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट