खाजगी व्हिडिओ लीक करेन, धमकी देत डॉक्टरकडून 5 लाख उकळले; भामट्याला अटक

आरोपी राजा वेणू नायकर उर्फ ​​केडी राजा याच्यावर 15 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खंडणी, हल्ला, धमकी देणे आणि चोरी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. यापूर्वी त्याच्यावर अनेक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती.

खाजगी व्हिडिओ लीक करेन, धमकी देत डॉक्टरकडून 5 लाख उकळले; भामट्याला अटक
crime news
| Updated on: Apr 10, 2025 | 11:45 AM

एका डॉक्टरचा खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 1-2 नव्हे तर तब्बल 5 लाख रुपये उकळणाऱ्या एका भामट्याचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत अटक केली आहे. खाजगी व्हिडिओ लीक करेन अशी धमकी 26 वर्षांच्या डॉक्टरला 43 वर्षांच्या आरोपीने दिली होती. अखेर त्या डॉक्टराने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर वडाळा टीटी पोलिसांनी त्या भामट्याला बेड्या ठोकल्या. राजा वेणू नायकर उर्फ ​​केडी राजा असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजा वेणू नायकर उर्फ ​​केडी राजा याच्यावर 15 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खंडणी, हल्ला, धमकी देणे आणि चोरी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. यापूर्वी त्याच्यावर अनेक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती.

फोनवरून डॉक्टरला दाखवला खासगी फोटो आणि पैसे उकळले

पोलिसांच्या सांगण्यानुसार, पैसे उकळण्याची ही घटना साधारण महिन्याभरापूर्वी 6 मार्च रोजी घडली. तेव्हा आरोपी राजा वेणू नायकर उर्फ ​​केडी राजा याने 26 वर्षांचा फिर्यादी डॉक्टरची भेट घेतली होती. आरोपी तेव्हा डॉ्कटरांच्या क्लिनिकमध्ये गेला आणि त्याने डॉक्टरला त्याच्या मोबाईलमधून एका खासगी फोटो दाखवला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये म्हणून आरोपीने डॉक्टरकडे 60 हजार रुपये मागितले. मात्र फिर्यादी डॉक्टर तेव्हा घाबरला, परिणाम काय होतील याची त्याला खूप काळजी वाटत होती. आपल्याकडे आत्ता तेवढे पैसे नाहीत असे सांगत डॉक्टरने आरोपीला जीपेवरून 1500 रुपये दिले.

वारंवार केली पैशांची मागणी

मात्र आरोपी काही सुधारला नाही, त्याने डॉक्टरला ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. काही दिवसांनी तो आरोपी पुन्हा डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये आला आणि धमकी देऊन 5 लाख रुपये दे, अशी मागणी केली. अखेर तो डॉक्टर घाबरला, पण त्याने हिंमत गोळा केली आणि पोलिसांत धाव घेत याप्रकरणी तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास केला आणि आरोपीला अटक करण्यात आली. मात्र आरोपीलातो व्हिडीओ कुठून मिळीाला, तसेच त्या व्हिडीओची सत्यता पडताळण्यासाठी फॉरेन्सिक तपास केला जात आहे