कौटुंबिक वादामुळे पारा चढला, शेवटी डॉक्टरने भावावरच केला गोळीबार, गुन्हा दाखल, अहमदनगर हादरलं !

| Updated on: Nov 17, 2021 | 7:00 PM

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घरगुती वादातून राग अनावर झाल्यामुळे डॉक्टर भावाने दुकानदार भावावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात दुकानदार भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कौटुंबिक वादामुळे पारा चढला, शेवटी डॉक्टरने भावावरच केला गोळीबार, गुन्हा दाखल, अहमदनगर हादरलं !
FIRING
Follow us on

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घरगुती वादातून राग अनावर झाल्यामुळे डॉक्टर भावाने दुकानदार भावावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. या गोळीबारात दुकानदार भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकारानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्षुल्लक भांडणामुळे भावावर गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे विजय मुनोत आणि मनोज मुनोत हे दोन भाऊ राहतात. यातील विजय मुनोत हा डॉक्टर आहे. या दोन्ही भावांमध्ये कौकुंबिक कारणातून वाद झाला. हा वाद नंतर टोकाला गेला. भांडणादरम्यान राग अनावर झाल्यामुळे विजय मुनोत याने आपला भाऊ मनोज मुनोत याच्यावर थेट गोळीबार केला. या घटनेमुळे काश्टी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिलेन पाहणी केली. डॉक्टर विजय मुनोत याने मनोज देवीचंद मुनोत यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरु 

या गोळीबारात मनोज मुनोत जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी 11 च्या सुमारास ही घटना घडली. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

पुण्यात गँग वॉरमधून गोळीबार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद 

तर दुसरीकडे मागील महिन्यात पुण्यात दोन गँगमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये 24 ऑक्टोबर रोजी गँग वॉरमधून दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली होती. दोन टोळ्यांमध्ये भर रस्त्यात गोळीबार झाला होता. यात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला होता . या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पुण्याजवळील उरळी कांचन परिसरात वाळू माफिया संतोष जगताप या गुंडावर झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले होते. बचावासाठी जगताप याच्या अंगरक्षकाने बापूसाहेब खैरे या गुंडावर फायरिंग केली होती, त्याचाही त्या घटनेत मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदापूर जवळून दोघांना ताब्यात घेतलं होतं. शिवाय त्यांच्याकडून पिस्तुल आणि वाहन जप्त करण्यात आले होते.

इतर बातम्या :

Chhorii Trailer Release | ‘लपाछपी’चा हिंदी रिमेक, नुसरत भरुचा अभिनित भयपट ‘छोरी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

औरंगाबादः वैजापूरात काका पुतण्यातील बेबनाव चव्हाट्यावर, अभय पाटील चिकटगावकर भाजपच्या गोटात जाणार

Acid Attack | विवाहित महिलेला लग्नाची मागणी, वारंवार नकार दिल्याने हात बांधून अंगावर अ‍ॅसिड ओतलं, राजधानीतील धक्कादायक घटना