AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Acid Attack | विवाहित महिलेला लग्नाची मागणी, वारंवार नकार दिल्याने हात बांधून अंगावर अ‍ॅसिड ओतलं, राजधानीतील धक्कादायक घटना

राजधानी दिल्लीत (Delhi Acid Attack) 12 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या अ‍ॅसिड पीडितेने (Acid Attack Victim) अखेर उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. सोमवारी दुपारी राम मनोहर लोहिया रुग्णालयात महिलेने अखेरचा श्वास घेतला. शवविच्छेदनानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेच्या मृत्यूनंतर तिचा पती आणि तीन निरागस मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Acid Attack | विवाहित महिलेला लग्नाची मागणी, वारंवार नकार दिल्याने हात बांधून अंगावर अ‍ॅसिड ओतलं, राजधानीतील धक्कादायक घटना
acid-attack
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 11:40 AM
Share

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत (Delhi Acid Attack) 12 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या अ‍ॅसिड पीडितेने (Acid Attack Victim) अखेर उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. सोमवारी दुपारी राम मनोहर लोहिया रुग्णालयात महिलेने अखेरचा श्वास घेतला. शवविच्छेदनानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेच्या मृत्यूनंतर तिचा पती आणि तीन निरागस मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आरोपीने तिच्या मुलांना निराधार केले आहे. त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी पीडितेच्या पतीने केली आहे.

महिलेवर अ‍ॅसिड हल्ला

ही खळबळजनक घटना घडवून आणणाऱ्या आरोपीचे नाव मोंटू असून तो महिलेवर अ‍ॅसिड ओतून फरार झाला होता. मोंटूने महिलेचे हात बांधून तिच्या अंगावर अ‍ॅसिड ओतल्याची घटना 3 नोव्हेंबर रोजी घडली होती. पीडित महिलेचे 2011 मध्ये लग्न झाले होते. ती पती आणि तीन मुलांसह पूंठखुर्द येथे राहत होती. तिला नऊ वर्षांची मोठी मुलगी आणि सात आणि पाच वर्षांची दोन मुले आहेत.

लग्नासाठी दबाव

पीडितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, “मोंटू सतत पत्नीचा पाठलाग करायचा. तो तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. सुरुवातीला महिलेने मोंटूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, मात्र नंतर तिने हा सर्व प्रकार पतीला सांगितला. याचाच राग आल्याने मोंटू हा सतत मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होता.”

3 नोव्हेंबरला मोंटूने विवाहितेवर अ‍ॅसिड ओतून तिला गंभीररित्या जखमी केले. या घटनेनंतर आरोपी बिहारमधील बक्सर येथे पळून गेले. महिलेच्या पतीला मारण्यासाठी आरोपीने पिस्तूलही खरेदी केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी बिहारमधून आरोपीला अखेर अटक केली.

अ‍ॅसिड पुरवणाऱ्यालाही अटक

त्याचवेळी 8 नोव्हेंबरला पोलीस आरोपीसोबत हत्यार जप्त करण्यासाठी शाहबाद डेअरी परिसरात पोहोचले. तेथे आरोपीने पोलीस पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागली. आरोपीला अ‍ॅसिड पुरविणाऱ्या राम सेवक नावाच्या व्यक्तीलाही पोलिसांनी यूपीतील शाहजहान येथून अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

नोएड्यातील पोलीस ठाण्यात अजब तक्रार दाखल, पतीच्या सांगण्यावरुन पत्नीविरोधात हनीट्रॅपचा गुन्हा

Kerala RSS worker killed: 27 वर्षीय संघ कार्यकर्त्याची पत्नीसह बाहेर जाताना धारदार शस्त्रानी हत्या

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.