AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रायफलमधून चुकून झाली फायरिंग, मुंबईत शिपायाचा जागीच मृत्यू

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

रायफलमधून चुकून झाली फायरिंग, मुंबईत शिपायाचा जागीच मृत्यू
| Edited By: | Updated on: Oct 19, 2020 | 7:01 AM
Share

मुंबई : मुंबईत एका शिपायाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वत:च्याच रायफलमधून चुकून फायरिंग होऊन गोळी लागल्याने शिपायाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. (a soldier died on the spot in Mumbai by Accidental firing)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या घाटकोपरमध्ये ही घटना घडली आहे. नौदलाच्या मटेरियल ऑर्गनाइज़ेशन (डिपो) मध्ये डीएससीत कार्यरत असणारे रायपाल सिंह यांचा मृत्यु रायफलच्या गोळ्या लागल्याने झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मृतदेहाजवळ त्यांच्या सर्विस रायफलमधील 2 रिकामी काडतूसं मिळाली. घटनेनंतर नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना याबाब माहिती दिली.

सदरची घटना रविवारी रात्री 8च्या सुमारास घडली. यावेळी परिसरात नागरिकांची लगबग होत. त्यात गोळ्यांचा आवाज आल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. (a soldier died on the spot in Mumbai by Accidental firing)

रायफलमधून अचानक गोळ्या कशा झाडल्या गेल्या? की रायपाल सिंह यांनी आत्महत्या केली आहे, याचा पोलीस आता शोध घेत आहे. या संदर्भात नौसेना आणि पोलीस तपासा करत आहे. पंजाबच्या संगरूर जिल्ह्याचे रायपाल हे अनेक वर्षांपासून घाटकोपर नवल डिपोमध्ये काम करत होते. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला की यामध्ये काही वेगळं कारण हे शोधण्यासाठी पोलीस तपास करत असून अधिक माहितीसाठी स्थानिकांची आणि डेपोतील प्रत्यक्षदर्शींची चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर नेमका अपघात कसा झाला हे पाहण्यासाठी पोलीस सीसीटीव्हीदेखील तपासणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या –

अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान, राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी- धनंजय मुंडे

नोकरी शोधताय? पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती

(a soldier died on the spot in Mumbai by Accidental firing)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.