SRPF जवानाच्या नावे फेसबुक अकाऊंट, चुलत भावाकडे पैशाची मागणी, एका फोनमुळे आरोपीचा प्लॅन फसला

SRPF जवानाच्या नावे फेसबुक अकाऊंट, चुलत भावाकडे पैशाची मागणी, एका फोनमुळे आरोपीचा प्लॅन फसला

सोशल मीडियावर फसवणूक करणार्‍यांनी अनेकांचे बोगस फेसबुक अकाउंट बनवून संबंधित लोकांकडून काही निमित्त सांगून पैसे मागितल्याच्या घटना सध्या वाढत आहेत.

अक्षय चोरगे

|

May 30, 2021 | 5:19 PM

मुंबई : सोशल मीडियावर फसवणूक करणार्‍यांनी अनेकांचे बोगस फेसबुक अकाउंट बनवून संबंधित लोकांकडून काही निमित्त सांगून पैसे मागितल्याच्या घटना सध्या वाढत आहेत. अशीच एका घटना SRPF चा जवान आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत घडली आहे. ज्यात आरोपीने कोरोना आजाराच्या नावाखाली फसवणूक केली आहे. (Fake Facebook account in the name of SRPF jawan, Demanding money from cousin, a phone call foiled a cyber criminal’s plan)

डिजिटल इंडियाला सायबर गुन्ह्यांना सामोरे जावं लागत आहे. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये एका सायबर गुन्हेगाराने थेट पोलिसालाच फसवलं आहे. या गुन्हेगाराने बोगस फेसबुक अकाऊंट बनवून फसवणूक केली आहे.

सायबर गुन्हेगाराने एसआरपीएफ जवान मनोहर पाटील यांच्या फेसबुक अकाउंटच्या धर्तीवर बनावट फेसबुक अकाउंट तयार केले आणि आजारी असल्याचा बहाणा करत पाटील यांच्याकडे पैशाची मागणी केली. गुजरातमध्ये राहणारा मनोहरचा चुलत भाऊ भूषण पवार या सायबर चीटरच्या भुलथापांना बळी पडला. मनोहर बनून भूषण पवार याने सहा ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून भूषणकडून 1 लाख रुपये मागवून घेतले. सगळे ट्रान्झॅक्शन बंधन बँकेच्या खात्यात झाले.

1 लाख रुपये ट्रान्सफर केल्यानंतर भूषणला वाटले की, आपण एकदा मनोहरला फोन करून विचारुया की, कोणाची तब्येत खराब आहे? जेव्हा भूषणने मनोहरल पैसे मिळण्याबाबत विचारले तेव्हा मनोहर म्हणाला की, मी कसलेच पैसे मागितले नाही. तेव्हा भूषणच्या पायाखालची जमीनच सरकली.

आरोपीचा शोध सुरू

समता नगरच्या सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे म्हणाल्या की, सदर फसवणुकीच्या प्रकरणात 21 मे रोजी एसआरपीएफ जवान मनोहरने उत्तर प्रादेशिक सायबर सेलमध्ये स्वतःच्या नावावर बनावट फेसबुक आयडी बनवल्याची आणि आपल्या नातेवाईंकाबरोबर फसवणूक केल्याबाबत गुन्हा नोंदवला होता. पीएसआय संदीप शिवाळे, पोलीस नाईक गणेश अहिरे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि त्यांनी तातडीने फसवणूक करणाऱ्याचे बंधन बँकेतील खाते सीज केले. अशा प्रकारे मनोहरचे एक लाख रुपये परत मिळवण्यात उत्तर मुंबई सायबर सेलला यश आले. मात्र अद्याप आरोपीचा शोध सुरू आहे.

…म्हणून पैसे वाचले

एसआरपीएफचे जवान आणि तक्रारदार मनोहर पाटील म्हणाले की, पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे आरोपीला पैसे काढता आले नाही. सायबर अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करत संबंधितांना पैसे परत दिले. पैसे परत मिळाल्यानंतर मनोहर यांनी उत्तर विभागातील सायबर सेल पोलिसांचे आभार मानले आणि सांगितले की सायबर सेलने त्वरित कारवाई केली नसती तर आमचे पैसे बुडाले असते. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे, असा प्रकार कोणासोबतही घडू शकतो. म्हणून सावध राहायला हवे आणि जर काही संशय आला तर लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करायला हवी. जेणेकरून पोलीस आरोपींच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करून पीडितांना न्याय देऊ शकतील, तसेच आरोपीला शिक्षा होऊ शकते.

इतर बातम्या

लॉकडाऊन सुरु असताना बंगल्यात डान्स पार्टीचं आयोजन, पुण्यात 13 तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल

घरगुती वाद विकोपाला, शिवसेनेचा पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला; भाजप आमदारासोबत पीडिता पोलीस ठाण्यात

(Fake Facebook account in the name of SRPF jawan, Demanding money from cousin, a phone call foiled a cyber criminal’s plan)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें