बाप झाला वैरी, आधी 10 वर्षांच्या लेकीला संपवलं, नंतर आणखी टोकाचं पाऊल, अहमदनगरमध्ये खळबळ

अहमदनर जिल्ह्यातील केडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने 10 वर्षाच्या पोटच्या मुलीची हत्या करुन आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. कर्जाला कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

बाप झाला वैरी, आधी 10 वर्षांच्या लेकीला संपवलं, नंतर आणखी टोकाचं पाऊल, अहमदनगरमध्ये खळबळ
बाप झाला वैरी, आधी 10 वर्षांच्या लेकीला संपवलं, नंतर आणखी टोकाचं पाऊल

अहमदनगर : अहमदनर जिल्ह्यातील केडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने 10 वर्षाच्या पोटच्या मुलीची हत्या करुन आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. कर्जाला कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. पण त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृतक दहा वर्षीय मुलीचं मैथिली फाटक असं नाव आहे. तर तिच्या 40 वर्षीय वडिलांचं संदीप फाटक असं नाव आहे. तर आईचं किरण फाटक (वय 32) असं नाव आहे.

संदीप फाटक यांनी आधी आपल्या मुलीची हत्या केली. त्यानंतर फाटक दाम्पत्याने आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. दुसरीकडे पतीने मुलीसोबत पत्नीची देखील हत्या केली का? याचा तपास पोलीस करत आहेत. केडगाव देवी रोडवरील अथर्व नगर ठुबे मळा येथील फाटक कुटुंबात हा प्रकार घडलाय. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आजारपणाला कंटाळून विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

दोन दिवसांपूर्वी अहमदनगमधून अशीच काहिशी काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली होती. आजारपणाला कंटाळून विवाहितेने चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना श्रीरामपूरमध्ये उघडकीस आली होती. श्रीरामपूरच्या टाकळीमियात ही घटना घडली होती. मायलेकीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विद्या दिलीप कडु (वय 25) आणि सिध्दी दिलीप कडु (वय 4) असे आत्महत्या केलेल्या मायलेकीचे नाव आहे. विद्या ही शाळेत असल्यापासून थोडीशी मनोरुग्ण होती.  तिला तेव्हापासून औषधोपचार चालु होते. विद्याची श्रीरामपूर येथील दवाखान्यात मासिक ट्रिटमेंट चालू होती. या आजारामुळे ती सुमारे तीन वर्षापासून टाकळीमिया येथे माहेरी राहत होती. विद्या ही या औषधोपचार आणि इंजेक्शनला पूर्णपणे वैतागली होती. तिने संधी साधून आपल्या लहान चिमुकलीला घेऊन जवळच असलेल्या विहीरीत उडी घेत आत्महत्या केलीय.

नाशिकमध्ये बाळाची हत्या करुन आईची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

बाळाची हत्या करुन आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. महिलेसोबतच बाळाचाही मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र महिलेच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. बाळाची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली आहे. मात्र सुसाईड नोटमध्ये या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे.

दोन मुलांच्या हत्येनंतर आईची आत्महत्या

दरम्यान, दोन चिमुकल्या मुलांची हत्या करुन महिलेने गळफास घेतल्याची घटना नुकतीच राजस्थान राज्यातील बाडमेरमध्ये उघडकीस आली होती. सहा वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांच्या मुलाचा जीव घेऊन विवाहितेने स्वतःचंही आयुष्य संपवलं. हुंड्याच्या दबावातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून बहिणीने सामूहिक आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील तपास सुरु केला आहे.

हेही वाचा :

दहावीच्या अभ्यासात मदतीचा बहाणा, नवी मुंबईत 17 वर्षांच्या चुलत भावाकडून बलात्कार, पीडिता गर्भवती

मॉर्निंग वॉकला जाताना ट्रकची धडक, महिला पोलिसाचा जागीच मृत्यू

घरकाम करणाऱ्या महिलेची दगडाने ठेचून हत्या, कल्याणच्या उच्चभ्रू भागात मृतदेह आढळला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI