धक्कादायक, महिला DSP ने मैत्रिणीच्याच घरात असं नको ते काम केलं, की पोलिसांवरचा उडेल विश्वास

पोलीस दलात DSP पदावर असलेल्या महिला अधिकाऱ्याने आपल्याच मैत्रिणीच्या घरात असं काम केलय की, तुमचा पोलिसांवरचा विश्वास उडेल. घटनेच्या दिवशी घरात असताना मोबाइल चार्जिंगला लावून ती आंघोळीसाठी गेली.

धक्कादायक, महिला DSP ने मैत्रिणीच्याच घरात असं नको ते काम केलं, की पोलिसांवरचा उडेल विश्वास
Crime
Updated on: Oct 30, 2025 | 1:36 PM

पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यावर तिच्या मैत्रिणीनेच चोरीचा आरोप केला आहे. ही महिला पोलीस डीएसपी पदावर आहे. डीएसपी कल्पना रघुवंशी विरोधात दोन लाख रुपये रोख आणि एक मोबाइल फोन चोरी केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेच्या हातात नोटांच बंडल दिसत आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हे हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे.

पीडितेने पोलिसांना सांगितलं की, घटनेच्या दिवशी घरात असताना मोबाइल चार्जिंगला लावून ती आंघोळीसाठी गेली. त्याचवेळी डीएसपीने संधी साधून बॅगेतून रुपये आणि मोबाइल काढून घेतला. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे महिला अधिकारी घरातून निघताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतय. फुटेजमध्ये महिला डीएसपी घरात येता-जाताना दिसतेय. सीसीटीव्हीत कैद झालेल्या फोटोंमध्ये आरोपी महिला डीएसपीच्या हातात नोटांचं बंडल दिसत आहे.

पोलिसांनी महिला डीएसपीला शोधलं का?

तक्रार मिळाल्यानंतर जहांगीरबाद पोलिसांनी डीएसपी कल्पना रघुवंशी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी पीडितेचा मोबाइल फोन हस्तगत केला. पण रक्कम अजून मिळालेली नाही. पोलीस आरोपी महिला डीएसपीच्या शोधात आहेत. लवकरच आरोपी महिलेला अटक करु असा पोलिसांचा दावा आहे.

पोलीस विभागाची लाज निघाली

आरोपी फरार असून पोलिसांच्या टीम्स त्यांचा शोध घेत आहेत, असं एडीसीपी बिट्टू शर्मा यांनी सांगितलं. प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलीस मुख्यालयाने विभागाची प्रतिष्ठा लक्षात घेऊन विभागीय कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. आरोपी अधिकाऱ्याला नोटीस जारी केली आहे. या सगळ्या घटनाक्रमाने पोलीस विभागाची लाज निघाली आहे. कारण जिच्यावर कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे, तीच आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहणार आहे.