पतसंस्थेत भरण्यासाठी दिलेले पाच लाख कर्मचाऱ्याने पळवले, कारण अस्पष्ट

| Updated on: Mar 13, 2022 | 8:12 AM

परळी (parali) येथील एका कर्मचाऱ्याला पतसंस्थेत भरण्यासाठी म्हणून पाच लाख रुपये घेऊन पळ काढला असल्याची तक्रार परळी शहर पोलीस (parali city police station) स्टेशन दाखल करण्यात आली आहे.

पतसंस्थेत भरण्यासाठी दिलेले पाच लाख कर्मचाऱ्याने पळवले, कारण अस्पष्ट
परळीतील पतसंस्था
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

परळी – परळी (parali) येथील एका कर्मचाऱ्याला पतसंस्थेत भरण्यासाठी म्हणून पाच लाख रुपये घेऊन पळ काढला असल्याची तक्रार परळी शहर पोलीस (parali city police station) स्टेशन दाखल करण्यात आली आहे. कर्मचाऱ्याने नेमकं असं का केलं ? याबाबत परळी शहर पोलिस चौकशी करीत असल्याचे समजते. त्याचबरोबर कर्मचारी अद्याप पोलिसांना सापडला नसून सापल्यानंतर कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं. कर्मचारी गायब असल्याचे पतसंस्थेतील अनेक कर्मचारी घाबरले आहेत. कर्मचाऱ्याने पैसे पळवले की त्याच्यासोबत काही घातपात झालाय अशी शंका देखील अनेकांना आहे. त्यामुळे कर्मचारी सापडल्याशिवाय कोणतीही गोष्ट स्पष्ट होणार नाही. आरोपी रोहित गजानन देशमुख (rohit gajanan deshmukh) याचा शोध पोलिस घेत आहे.

नेमकी काय आहे घटना

एका पतसंस्थेत भरण्यासाठी म्हणून पाच लाख रुपये रोख रक्कम घेऊन एकाने पोबारा केल्याची घटना घडली आहे. यामुळे परळीच्या बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.आरोपी रोहित गजानन देशमुख यास परळी नागरी सहकारी पतसंस्थेची पाच लाख रूपये रक्कम रेणुका माता मल्टीस्टेट पतसंस्थेत विश्वासाने भरणेकामी पाठवले असता, आरोपीने पैसे न भरता पैसे घेवुन कोठेतरी निघुन गेला. पतसंस्थेची रक्कम आहे हे माहीत असतानाही पैसे घेवुन निघुन गेला व फिर्यादीचा विश्वासघात केला म्हणून परळी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक विकास विजयकुमार रुद्रकंठवार यांनी परळी शहर पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली आहे.

परळीच्या बॅंकिंग क्षेत्रात खळबळ

रक्कम भरण्यासाठी गेले

ला माणूस पैशांसकट गायब झाल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच जोपर्यंत कर्मचाऱ्याचा शोध लागत नाही तोपर्यंत कारण काय आहे स्पष्ट होणार अशी पोलिसांची भूमिका आहे. पोलिस कर्मचाऱ्याचा कसून शोध घेत आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडल्या आहेत. तसेच आरोपी सापडल्यानंतर कारण सुध्दा अनोख्या पध्दतीची बाहेर आली आहेत. परळीच्या प्रकरणात कर्मचारी अचानक गायब झाल्याने तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा शोध घेतला परंतु त्याचा सुगावा लागत नसल्याने अधिका-यांनी सरळ परळी पोलिस स्टेशन गाठलं.

दिवसभर घरीच असेल कधीही या, देवेंद्र फडणवीसांचं ट्विट; पोलीस सागर बंगल्यावर येऊन चौकशी करणार

राज्यात 5 हजार 142 गावांमध्ये राबवणार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना; कसा होणार शिवाराचा कायापालट?

Maharashtra News Live Update : नागपुरात रंगणार आज अनोखी मॅरेथॉन, माय लेकी धावणार