Shocking: एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याने खळबळ; गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

| Updated on: Jul 02, 2022 | 7:30 PM

केरळमधील तिरुवनंतपुरमजवळील कल्लम्बलम भागात ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका घरात कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे सांगलीच्या म्हैसाळ येथे घडलेल्या घटनेची आठवण झाली आहे.

Shocking: एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याने खळबळ; गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
Follow us on

तिरुवनंतपूरम : एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना केरळमध्ये (Keral News) घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. याच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेल नाही.

केरळमधील तिरुवनंतपुरमजवळील कल्लम्बलम भागात ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका घरात कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे सांगलीच्या म्हैसाळ येथे घडलेल्या घटनेची आठवण झाली आहे.

केरळमध्ये घडलेल्या प्रकारात एकाच कुटुंबातील पाच जणं घरात मृतावस्थेत (Family 5 member death) आढळले. मृतांमधील दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. घरातील कर्ता पुरुष एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढलला. तर चौघांचे मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळले आहेत.

घरातून काहीच हालचाल न जणवल्याने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गळफास घेण्याआधी सर्व मृतांनी विषारी पदार्थाचं सेवन केलं असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांची दोन मुलं आणि अन्य महिला नातेवाईकाचाही समावेश आहे.

यांच्या आत्महत्येमागचे नेमकं कारण समजू शकलेले नाही. मात्र कर्जाच्या तणवातून यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. ही दिवसांपूर्वी कुटुंबाने एक घर खरेदी केलं होतं. कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होतं. त्यामुळे कर्जाच्या तणावातून कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृत कुटुंबातील प्रमुखाचं नाव मणिकुट्टन आहे. त्याचा हॉटेलचा व्यवसाय होता. दोन दिवसांपूर्वी खाद्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी हॉटेलचं निरीक्षण केलं होतं. आणि त्यांनी मणिकुट्टनवर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. यानंतर काही काळासाठी हॉटेल बंद करण्यात आलं होतं. कर्जामुळे तो तणावात होता त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे.

अंधश्रद्धेतूनच सांगलीतल्या ‘त्या’ 9 जणांना विषारी गोळ्यांचं लिक्विड पाजलं; सोलापुरातल्या मांत्रिकासह दोघांवर गुन्हा दाखल

म्हैसाळमध्ये झालेल्या 9 जणांचे हत्याकांड हे अंधश्रेद्धेतूनच (Superstition) झाल्याचा खुलासा सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केला आहे. यानुसार अंधश्रद्धा अधीनियमाखाली नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर गुप्तधन मिळवून देण्यासाठी संशयितांनी मृताकडून मोठी रक्कम घेतली होती. या पैशाच्या तगाद्यातून दोघा संशयितांनी 9 जणांना विषारी गोळ्यांचे पावडर करून त्याचे लिक्विड पाजून त्यांची निर्घृण हत्या (Murder) केल्याचे समोर आले. या घटनेनंतर 9 जणांनी आत्महत्या केल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. मात्र तिथे सापडलेल्या चिठ्ठीवरून 25 जणांवर सावकारीचा गुन्हा दाखल (Filed a case) केला होता. तपास सुरू असतानाच गुप्त धन मिळवून देतो म्हणून आब्बास महंमदअली बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवसे या दोघांनी वेळोवेळी व्हनमोरे कुटुंबाकडून मोठ्या रकमा दिल्याचे समोर आले.