Fake News Issue: न्यूज एन्करला अटक करण्यावरुन यूपीत हायवोल्टेज ड्रामा! छत्तीसगड पोलीस वि. यूपी पोलीस घमासान

| Updated on: Jul 05, 2022 | 1:35 PM

राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडच्या काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबाबत विधान केलं होतं.

Fake News Issue: न्यूज एन्करला अटक करण्यावरुन यूपीत हायवोल्टेज ड्रामा! छत्तीसगड पोलीस वि. यूपी पोलीस घमासान
रोहित रंजन यांना ताब्यात घेण्यावरुन ड्रामा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

झी टीव्ही न्यूजचे अँकर रोहित रंजन (Rohit Ranjan News) यांना ताब्यात घेण्यावरुन छत्तीसगड पोलीस विरुद्ध यूपी पोलीस (Chhattisgarh Police vs UP Police) असा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. छत्तीसगड पोलिस रोहित रंजन यांना अटक करण्यासाठी पहाटे पहाटेच त्यांच्या घराबाहेर पोहोचले होते. पण रोहित रंजन यांनी ट्वीट करत छत्तीसगड सोबत उत्तत प्रदेश पोलीस आणि योगी आदित्यनाथ यांनाही टॅग केलं. त्यानंतर छत्तीसगड पोलिसांना रोहित रंजन यांना अटकेची (Police arrest News) कारवाई करण्यापासून रोखण्यात आलं. त्यामुळे छत्तीसगडधील काँग्रेस सरकार विरुद्ध यूपीतील भाजप सरकार असाही वाद यानिमित्तानं पाहायला मिळाला. राहुल गांधी यांच्याबाबत चुकीचं वृत्त दिल्याप्रकरणी ही अटकेची कारवाई छत्तीसगड पोलिसांकडून करण्यात येत होती. महत्त्वाचं म्हणजे हे वृत्त चुकीचं असल्याबाबत झी न्यूजकडून नंतर दिलगिरीही व्यक्त करण्यात आली होती. तसंच माफीही मागण्यात आलेली.

नाट्यमय घडामोडी

सकाळी साडे पाच वाजता छत्तीसगड पोलीस हे रोहत रंजन यांच्या घराबाहेर पोहोचले. त्यांना ताब्यात घेण्यासाठटी छत्तीसगड पोलिसांनी पहाटे पहाटेच हजेरी लावली होती. यानंतर ट्वीटर वॉर सुरु झालं. स्थानिक पोलिसांना माहिती न देताना छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई योग्य आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर नंतर रायपूर पोलिसांनी रिप्लायही केला. स्थानिक पोलिसांनी याबाबत माहिती देण्याची कोणतीही गरज नसते, असं उत्तर रोहित रंजन यांना रायपूल पोलिसांकडून देण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

या सगळ्या ट्वीटर वॉरच्या दरम्यान, गाझियाबाद पोलिसांनी रोहित रंजन यांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना घेऊन ते अज्ञात स्थळी गेले. उत्तर प्रदेश पोलिसांकडून रोहित रंजन यांच्यावर तुलनेने कमी कठोर कलम लावण्यात आली होती. जामीनपात्र कलमांखाली रोहित रंजन यांच्यावर यूपी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडच्या काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबाबत विधान केलं होतं. हे विधान उदयपूरमधील कन्हैय्या लाल हत्याकांडप्रकरणी जोडून राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. काही मुलांनी बेजबाबदारपणे हल्ला केला होता, ही लहान मुलं आहेत, त्यांना माफ करा, असं विधान राहुल गांधी यांनी केलेलं होतं. मात्र त्यांचं हेच वक्तव्य उदयपूर हत्याकांड प्रकरणाशी जोडून त्याचे चुकीचे अर्थ काढले गेले होते.

झी न्यूजकडून याप्रकरणी माफीही मागण्यात आलेली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनीही भाजप आणि आरएसएस यांच्यावर निशाणा साधला होता. कारण भाजपच्या काही नेत्यांकडून राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे चुकीचा अर्थ काढलेले व्हिडीओ शेअर करण्यात आले होते. चुकीचं वृत्त दिल्याप्रकरणी काँग्रेस शासित राज्य असलेल्या छत्तीसगडसह राजस्थानमध्येही पोलिसांत गुन्हे नोंदवण्या आले होते. त्यानंतर आता याचप्रकरणी छत्तीसगड पोलिसी आणि उत्तर प्रदेश पोलीस यांच्यात संघर्ष पाहायला मिळालाय.