लिव्ह इन पार्टनरने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, मग तरुणाने जे केलं ते पाहून धक्काच बसेल !

हल्ली महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरुन महिलांवर हल्ले करण्यात येत आहेत. अशीच एक धक्कदायक घटना पुन्हा उघडकीस आली आहे.

लिव्ह इन पार्टनरने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, मग तरुणाने जे केलं ते पाहून धक्काच बसेल !
| Updated on: Aug 19, 2023 | 9:56 AM

गुरुग्राम / 19 ऑगस्ट 2023 : शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केल्याची घटना गुरुग्राममध्ये घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 307, 323, 324 आणि 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शिवम असे आरोपीचे नाव आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सायबर सिटी गुरुग्राममधील नाहरपूर रुपा भागात ही घटना घडली.

काय घडलं नेमकं?

आरोपी शिवम आणि पीडिता दोघेही मूळचे यूपीचे रहिवासी आहेत. गेल्या वर्षभरापासून दोघे गुरुग्राममध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. शिवम हा लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी शीरीरिक संबंध ठेवायचा. शिवम हा आधीच विवाहित होता. त्याला दोन मुलंही होती. मात्र त्याने ही बाब तरुणीपासून लपवून ठेवली होती. मात्र तरुणीला जेव्हा सत्य कळले तेव्हा तिने शिवमशी संबंध तोडले आणि ती दुसरीकडे राहू लागली.

तरुणीची प्रकृती चिंताजनक

गुरुवारी दुपारी शिवम तरुणीच्या घरी गेला. तो तरुणीकडे शारीरिक संबंधाची मागणी करु लागला. तरुणीने त्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या शिवमने स्क्रू ड्रायव्हरने तरुणीवर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीच्या मानेवर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. पीडितेला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.