डोंबिवलीत ‘लिव्ह इन’ | ती ३०, तो ५५ वर्षाचा, पण २२ वर्षाचा तिला आवडला, पुढे क्रिकेटच्या बॅटने विषय संपवला

त्याचं रोजचं येणं नंतर तिला खटकू लागले. कारण तिची मैत्री आता एका तिच्यापेक्षाही तरूण मुलाशी झाली.पण एके दिवशी काय झाले...

डोंबिवलीत लिव्ह इन | ती ३०, तो ५५ वर्षाचा, पण २२ वर्षाचा तिला आवडला, पुढे क्रिकेटच्या बॅटने विषय संपवला
bat
Image Credit source: socialmedia
| Updated on: Apr 24, 2023 | 9:51 PM

डोंबिवली : हल्ली लिव्ह इन रिलेशनशिपचं फॅड भलतंच वाढत चाललं आहे. चागलं कुटुंब बायका पोरं असलेल्या त्या गृहस्थाचं एका तरूण मुलीशी अफेअर सुरू झालं आणि त्याने तिला घरही घेऊन दिलं. मग त्याचे रोजचे येणे जाणे सुरू झाले. पण तरूण असलेल्या तिला काही वर्षांतच बोर वाटू लागला आणि त्याचा चक्क तिला कंटाळा येऊ लागला. मग तिची ओळख तिच्या पेक्षा तरुण मुलाशी झाली आणि त्याची मैत्री सुरू झाली. यामुळे तिचा पहिला प्रियकर रूसून त्याने तिला दम दिला. परंतू तिने तिच्या तरूण मित्राला बोलावले आणि तोही त्याच वेळी घरी आला आणि गडबड झाली.

चांगला दृष्ट लागेल असा संसार असलेल्या पन्नाशी ओलांडलेल्या मारूती यांनी आपल्या तीशीच्या मैत्रिणी करीता डोंबिवलीसारख्या पांढरपेशी वस्तीत छान घर घेण्यास मदत केली. परंतू संध्याला त्याचं रोजचं येणं जाणं नंतर खटकू लागले. कारण तिची मैत्री आता गुडडू या विशीतील तरूणाशी झाली. आणि त्यांचे प्रेम सुरू झाले. याचा सुगावा मारूतीला लागलाच. त्याच्यांत त्यावरून वारंवार खटके उडू लागले. त्यामुळे मारूतीचे फोन घेणेही संध्या टाळू लागल्याने त्याचाही पारा चढला.

शब्दाला शब्द वाढू लागला

मारूती शनिवारी डोंबिवलीच्या घरी आला संध्याशी या विषयावर बोलू लागला. दोघांमध्ये शब्दाला शब्द वाढू लागला. गुड्डू देखील घरातच होता. मारूती याने संध्याला गुड्डूचा नाद सोडायला सांगितला. त्यातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संध्याने गुड्डूला उसकवले. त्यामुळे चिडलेल्या गुड्डूने क्रिकेटची बॅटच मारूतीच्या डोक्यात घातली. घाव वर्मी लागल्याने मारूती जाग्यावर पडला. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तसेच रिक्षात घालून रूग्णालयात भरती केले.

कोणीतरी मारहाण केल्याचे खोटेच सांगितले

संध्याने मारूतीच्या पत्नीला फोन करून तिच्या पतीला कोणीतरी मारहाण केल्याचे खोटेच सांगितले. त्यानंतर मारूतीचे कुटुंब डोंबिवलीला आले. संध्याने केस पेपर त्याच्या पत्नीच्या हातात देऊन ती पसार झाली. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अशा प्रकारे प्रेमाच्या त्रिकोणाचा एक कोन कायमचा मोडला. पोलिसांनी आरोपी म्हणून संध्याला आणि तिच्या दुसरा प्रियकराला पळून गावी पळून जाण्यापूर्वीच अटक केली.