त्याला सौदी अरेबियात नोकरी मिळाली होती, सौदीला निघण्याआधी प्रेयसीला भेटायला गेला अन्…

त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. दोघंही एकाच गावात राहणारे होते. तरुणाला परदेशात नोकरी मिळाली होती. परदेशी जाण्याआधी तरुण प्रेयसीला भेटायला गेला अन् त्यानंतर परदेशी नोकरीचं स्वप्न अधुरचं राहिलं.

त्याला सौदी अरेबियात नोकरी मिळाली होती, सौदीला निघण्याआधी प्रेयसीला भेटायला गेला अन्...
प्रेमाला विरोध असल्याने प्रेयसीच्या वडिलांनी तरुणाला संपवले
Image Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Jul 03, 2023 | 12:13 PM

बहराइच : प्रेम करण्याची खूप भयानक शिक्षा एका तरुणाला मिळाली आहे. या धक्कादायक घटनेने उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाला परदेशात नोकरी मिळाली होती. यासाठी तो परदेशात निघण्यापूर्वी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. मात्र प्रेयसीच्या वडिलांनी दोघांना एकत्र अन् त्यांना संताप अनावर झाला. प्रेयसीच्या वडिलांनी तरुणाची हत्या केली. इकबाल असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनेनंतर आरोपी कुटुंबीयांसह फरार झाला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या हेमरिया गावात ही घटना घडली.

तरुणीच्या वडिलांना प्रेमसंबंध मान्य नव्हते

इकबालचे दीर्घकाळापासून गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. मात्र तरुणीच्या वडिलांना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. तरुणीच्या वडिलांना मनवण्यासाठी शुक्रवारी गावात पंचायतही झाली होती. मात्र तरीही ते इकबाल आणि तरुणीच्या प्रेमासाठी राजी झाले नाहीत. शुक्रवारी रात्री तरुणीने फोन करुन इकबालल घरी भेटायला बोलावले होते. त्यानुसार इकबाल तिला भेटायला गेला. मात्र त्यावेळी तरुणीच्या वडिलांनी दोघांना एकत्र पाहिले.

हत्येनंतर आरोपी फरार

तरुणीच्या वडिलांनी इकबालला जबर मारहाण केली, यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने तरुणाचा मृतदेह मुलीच्या ओढणीने लटकवला आणि कुटुंबासह फरार झाला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे. आरोपीवर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. गावात त्याची प्रतिमा मलिन आहे. या घटनेमुळे गावात एखच खळबळ उडाली आहे. मयत इकबालला सौदी अरेबियात नोकरी मिळाली होती. सौदीला जायच्या आदल्या दिविशीच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.