
गुजरातच्या अहमदाबादमध्ये रुबीने आपल्या जोडीदाराला असं संपवलं, त्याने उत्तर प्रदेशच्या मेरठमधील मुस्कान रस्तोगी आणि एमपी इंदूरमधील सोनम रघुवंशी प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. मुस्कान आणि सोनमने अत्यंत क्रूर पद्धतीने नवऱ्याची हत्या केली होती. अहमदाबादच्या रुबीने सुद्धा असच केलय. तिचा गुन्हा पाहून दृश्यम चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. गुजरात अहमदाबाद पोलिसांनी एक वर्षाने या हत्याकांडाचा खुलासा केलाय. रुबीने तिचा प्रियकर आणि मित्रांच्या मदतीने मिळून पतीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह रहस्यमय पद्धतीने लपवून ठेवला. एकदम दृश्यम चित्रपटासारखी ही घटना आहे. पोलीस सतत बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा शोध घेत होते. गुन्हा इतक्या चलाखीने केलेला की, पोलिसांना मृतदेह शोधून काढायला एक वर्ष लागलं.
अहमदाबाद येथे राहणारे समीर अन्सारी (35) वर्ष 2024 मध्ये अचानक बेपत्ता झाले. वर्षभर त्यांचा शोध सुरु होता. पण काहीच थांगपत्ता लागत नव्हता. रुबी आणि तिचा नवरा समीर यांच्यामध्ये अनेकदा भांडणं व्हायची. रुबीचे इमरान सोबत अनैतिक संबंध होते, हे त्यांच्यातल्या भांडणाचं कारण होतं. या वादातून एका भयानक गुन्ह्याचा जन्म झाला. तीन महिन्यांपूर्वी गुन्हा क्राइम ब्रांचकडे आला, त्यावेळी समीरची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आला.
समीरचा मोबाइल फोन 14 महिने बंद होता
त्यांनी तपास सुरु केला. समीरचा मोबाइल फोन 14 महिने बंद होता. त्याने कुठला मित्र किंवा नातेवाईकाशी संपर्क केला नव्हता. पोलिसांनी इमरानला शोधून काढलं. त्याच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे झाले. एकदम फिल्मी पद्धतीने हत्या आणि मृतदेह लपवण्याची स्टोरी समोर आली. रुबीने दृश्यम चित्रपटाप्रमाणे प्रियकर आणि त्याच्या मित्रांसोबत मिळून पती समीर अन्सारीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह एकदम पद्धतशीरपणे लपवून ठेवला.
समीरला बांधलं, मग चाकू भोसकला
संशय होता. पण तिच्या कृत्याचा कुठलाही पुरावा नव्हता. रुबीने समीरची हत्या केल्यानंतर प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर तो मृतदेह तिने घरात किचनमध्ये जमिनीखाली गाडला. त्यावर टाइल्स लावले. आरोपी प्रियकराच्या कबुलीनंतर अहमबाद क्राइम ब्रांच टीमला घरात मृतदेहाचे अवशेष सापडले. अशा प्रकारे एका भयानक गुन्ह्याची उकल झाली. पोलीस चौकशीत इमरानने गुन्हा कबूल केला. त्यान पोलिसांना सांगतिलं की, रुबीने हत्येची योजना बनवलेली. आधी त्यांनी समीरला बांधलं, मग चाकू भोसकून त्याची हत्या केली. इतकच नाही, त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते किचनमध्ये जमिनीखाली पुरले.