AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मार्केट में नई लड़की आई है..! असं समजताच व्यावसायिकाचं डोकं फिरलं आणि मग जे काही झालं ते…

'मार्केट में नई लडकी आई है' असा मेसेज गेल्या काही दिवसात फिरत आहे. त्या मेसेजची भूरळ पडल्याने एका व्यवसायिकाला मोठा फटका बसला. इतकंच काय तर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे.

मार्केट में नई लड़की आई है..! असं समजताच व्यावसायिकाचं डोकं फिरलं आणि मग जे काही झालं ते...
मेसेजमध्ये आलेल्या मुलीचा फोटो पाहून व्यापारी झाला खूश, दिलेल्या पत्त्यावर पोहोचताच झालं असं की कधीच विसरू शकत नाही
| Updated on: Jun 03, 2023 | 8:58 PM
Share

सूरत : गेल्या काही दिवसात हॅनीट्रॅपची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. असाच काहीसा प्रकार गुजरातमधील सुरतमध्ये घडला आहे. एका व्यवसायिकाला आलेला मेसेज चांगलाच महागात पडला आहे. इतकंच काय तर 50 लाख रूपयेही गमवावे लागले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरण नोव्हेंबर 2022 सालचं आहे. पुणागाम गंगानगरमध्ये राहणाऱ्या पुरुषोत्तम सोलंकी आणि अभिनंदन सोसायटीत राहणारा पियुष वोराने एका महिलेसह चार मित्रांच्या मदतीने कापड व्यवसायिकाला हनीट्रॅमध्ये अडकवून 50 लाख रुपयांची फसवणूक केली.

कापड व्यवसायिकाच्या फोनवर नोव्हेंबर 2022 मध्ये एक मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, ‘मार्केट में नई लडकी आयी है’. या मेसेजसोबत मुलीची फोटो आणि नानपुराच्या अपार्टमेटचा पत्ता पाठवला होता. व्यापारी दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्यानंतर तिथे दबा धरून बसलेल्या आरोपिंना त्याला फसवणूक केली.

पोलिसांच्या वेशात येत लुटले 50 लाख रुपये

व्यवसायिक प्लॅटमध्ये येताच बनावट पोलिसांनी तिथे धाड टाकली. पोलीस पाहाताच व्यापारी घाबरला. आरोपिंनी केस आणि अटक करण्याची भीती घातली. त्यामुळे प्रकरण दाबण्यासाठी 10 लाखांची मागणी केली. अब्रू वाचवण्याच्या भीतीने व्यवसायिकाने दहा लाख रुपये दिले आणि प्रकरण संपलं. मात्र एक महिन्यानंतर गँगने पुन्हा त्याला धमकवण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्याने त्यांना 40 लाख रुपये दिले.

व्यापारी आपल्या जाळ्यात अडकल्याचं पाहून आरोपींनी काही दिवसानंतर पुन्हा एकदा 20 लाखांची मागणी केली. मात्र व्यापाऱ्याला आरोपींचा संशय येताच त्याने वेसू पोलीस ठाण्यात तक्रार केली.पीडित व्यवसायिकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. तर एका महिलेसह अन्य आरोपी फरार आहेत. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.