Gunratna Sadavarte : भारत माता की जय… आर्थर रोड कारागृहाबाहेर माध्यमांसमोर गुणरत्न सदावर्तेंची घोषणाबाजी!

| Updated on: Apr 20, 2022 | 7:49 PM

सदावर्ते यांनी भारत माता की जय... वंदे मातरम् ... अशा घोषणा दिल्या. यापूर्वीही त्यांनी मुंबई पोलीस आणि सातारा पोलिसांच्या ताब्यात असताना, कोर्टात घेऊन जाताना माधम्यांच्या कॅमेरासमोर घोषणा दिल्या होत्या. त्याचबरोबर कॅमेरासमोर ते सातत्याने व्हिक्टरी साईनही दाखवतात.

Gunratna Sadavarte : भारत माता की जय... आर्थर रोड कारागृहाबाहेर माध्यमांसमोर गुणरत्न सदावर्तेंची घोषणाबाजी!
गुणरत्न सदावर्तेंची घोषणाबाजी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना दिसाला मिळाला असला तरी त्यांची स्थिती सध्या आगीतून फुफाट्यात अशीच आहे. कारण, सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना जामीन मंजूर करण्यात आला असला तरी आता कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) त्यांचा ताबा घेतलाय. कोल्हापूर पोलीस सदावर्ते यांना घेऊन आर्थर रोड कारागृहातून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. कोल्हापूर पोलीस सदावर्ते यांना घेऊन जाण्यासाठी आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Prison) पोहोचले आणि त्यांना घेऊन निघाले. त्यावेळी सदावर्ते यांनी भारत माता की जय… वंदे मातरम् … अशा घोषणा दिल्या. यापूर्वीही त्यांनी मुंबई पोलीस आणि सातारा पोलिसांच्या ताब्यात असताना, कोर्टात घेऊन जाताना माधम्यांच्या कॅमेरासमोर घोषणा दिल्या होत्या. त्याचबरोबर कॅमेरासमोर ते सातत्याने व्हिक्टरी साईनही दाखवतात.

सदावर्ते मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा!

मराठा आरक्षणाच्या आंदोलनदरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे गुणरत्न सदावर्ते पोलिसात तक्रार देण्यात आली. आधी सातारा त्या नंतर कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 18 एप्रिलला सातारा न्यायालायनं गुणरत्न सदावर्ते यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांना अर्थर रोड कारागृहात आणण्यात आलं. दरम्यान, एकीकडे गिरगाव पोलिसांनी सदावर्तेंनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे सातारा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज मंजूर केलाय.त्यामुळे आता गुणरत्न सदावर्तेंचा ताबा मुंबई, सातारा यानंतर कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आलाय.

सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर

एकीकडे गिरगाव कोर्टानं सदावर्तेंनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे सातारा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज मंजूर केलाय. त्याचवेळी कोल्हापूर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मागितला. तशी मागणी त्यांनी कोर्टात केली होती. दरम्यान, सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना एककीडे दिलासा मिळाला होता. मात्र आता साताऱ्यानंतर त्यांची रवानगी कोल्हापुराला करण्यात आलीय.

गुणरत्न सदावर्तेंची वकिली धोक्यात?

गुणरत्न सदावर्तेंचा कोठडी मुक्काम आणि कोर्टवाऱ्या सुरू आहेत. मात्र अशात आता बार काऊन्सिलकडेही सदावर्तेंची सनद रद्द करण्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. वकिल गुणरत्न सदावर्तेंविरोधात महाराष्ट्र बार कौन्सिल आणि गोवा बार कौन्सिलकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा! अजून कुठे कुठे गुन्हे दाखल?

Gunratna Sadavarte: कबुल, कबुल, कबुल! गुणरत्न सदावर्तेंनी 1, 44,00000 एवढे पैसे एस.टी. कर्मचाऱ्यांकडून घेतले? हिशेब वाचा