जॅकलीनच्या मैत्रीसाठी अमित शहांचा ‘कॉल स्पूफ’; 9 लाखांचे मांजर दिले, थापड्या सुकेशच्या उठाठेवी

जॅकलीनच्या मैत्रीसाठी अमित शहांचा 'कॉल स्पूफ'; 9 लाखांचे मांजर दिले, थापड्या सुकेशच्या उठाठेवी
जॅकलीन फर्नांडिस

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसशी मैत्री करण्यासाठी सुकेशने शहा यांचा फोन नंबर चोरल्याचे उघड झाले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 14, 2021 | 10:11 AM

नवी दिल्लीः देशभरातील अनेकांना गंडा घालून तब्बल 200 कोटीपेक्षा जास्त रक्कम हडपणारा थापाड्या सुकेश चंद्रशेखरने गृहमंत्री अमित शहा यांनासुद्धा सोडले नाही. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसशी मैत्री करण्यासाठी सुकेशने शहा यांचा फोन नंबर चोरल्याचे उघड झाले आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत दाखल केलेल्या आरोपत्रात ही माहिती दिली आहे.

 ‘कॉल स्पूफ’ म्हणजे काय?

सुकेश चंद्रशेखरने गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाचा नंबर स्पूफ करून फोन केला. शिवाय आपण तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या राजकीय परिवाराशी संबंधित असल्याचे सांगितले. ईडीनेच त्याच्या साऱ्या करामती समोर आणल्या आहेत. ईडीने मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत दाखल केलेल्या आरोपत्रात ही माहिती दिली आहे. ‘कॉल स्पूफ’ म्हणजे फोनची रिंग वाजल्यानंतर फोन करणाऱ्याचा खरा नंबर दिसत नाही, तर दुसऱ्या कोणाचा नंबर दिसतो.

जॅकलीनचा दोनदा जबाब

ईडीने जॅकलीन फर्नांडिसचा वर्षभरात दोनदा जबाब नोंदवला. चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडीसला स्वतःचा परिचय शेखर रत्न वेला असे करून दिल्याचे तिने सांगितले. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ईडीने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर सहा जणांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

जॅकलीन कशी फसली?

ईडीच्या म्हणण्यानुसार, सुकेशने जॅकलीनवर अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला. तिच्या त्याने तब्बल 10 कोटी रुपये खर्च केले. सोने आणि हिऱ्यांचे दागिने भेट म्हणून दिले. अतिशय महागड्या काचेच्या वस्तू भेट दिल्या. एक 52 लाखांचा घोडाही भेट दिला.

9 लाखांची पर्शियन मांजर

सुकेशने जॅकलीनला 4 पर्शियन मांजर भेट दिले आहेत. त्यात एका मांजराची किंमत 9 लाख रुपये असल्याचे समजते. इतकेच नाही, तर जॅकलीनसाठी चार्टर्ड विमानावरही कोट्यवधी रुपये खर्च केले. तिला चार्टर्ड विमानाने मुंबईहून दिल्लीला बोलावले. दिल्लीहून चेन्नईला जाण्यासाठी चार्टर्ड विमान बुक केले. दोघेही चेन्नईतल्या वेगवेगळ्या महागड्या हॉटेलमध्ये थांबले. या काळात दोघे तीन ते चारदा भेटल्याचे समजते.

देशभरात अनेकांना गंडा

सुकेश चंद्रशेखरने देशभरातही अनेकांना गंडा घातल्याचे समजते. त्याने जवळपास दोनशे कोटी रुपये अशा प्रकारे हडपले आहेत. त्याच्या नाना करामती येणाऱ्या काळात पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीने त्या अनुषंगाने आपला तपास सुरू केल्याचे समजते.

इतर बातम्याः

Akola MLC Election Result: अकोल्यातून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत, भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी

Nashik | 6 नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फाटाफूट; 311 उमेदवार रिंगणात

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें