
आई-वडील विभक्त झाल्यामुळे चार बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबदारी दिलेल्या इसमानेच त्या चौघींवरही अत्याचार केल्याची बयानक घटना काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. आरोपी बजरंग साळुंखेने चारही बहिणींना वासनेची शिकार बनवत त्यांचं आयुष्य खराब केलं. ही घटना उघडकीस आल्यावर प्रचंड खळबळ माजली होती. मात्र या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असाताना आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. याप्रकरणात एक मोठा ट्वि्स्ट आला आहे.
तो ट्विस्ट म्हणजे चार बहिणींवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला बजरंग साळुंखे हा फक्त अत्याचारी नव्हे तर तो खुन देखील आहे.आरोपी बजरंग याने सहा महिन्यांपूर्वीच त्याचा मेहुणा निलेश सारंगधर याचा खून केल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे. टकेत असलेला आरोपी बजरंग साळुंखे याने सहा महिन्यांपुर्वी आपल्या मेव्हुण्याचा खून करून घराजवळ पुरल्याची कबुली दिली आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी मृत निलेश याचा मृतदेह उकरून काढत, तिथेच , त्या जागेवरच त्याचे शवविच्छेदनही केल्याचे समजते. मात्र यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून या खुनामुळे लोकांना मोठा धक्का बसला आहे.
नेमकं काय घडलं ?
आई-वडील विभक्त झाल्याने सख्ख्या 4 बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबादारी ही, त्या मुलींचा दूरचा नातेवाईक असलेल्या बजरंग साळुंखे याच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र त्याने त्या मुलांचा नीट सांभाळ तर केला नाही, उलट आयुष्यभर लक्षात राहतील अशा वेदना त्यांना दिल्या. बजरंग याची नियत फिरली, त्याने आणि त्याच्या मेहण्याने चारही बहिणींवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यावर मोठी थळबळ माजली.
त्यानंतर याप्रकरणी गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. पोलिसांनी राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे राहणारा आरोपी बजरंग साळुंखे आणि त्याच्या पत्नीला अटक केली होती. तर अत्याचाराता आरोप असलेला आणखी एक इसम, बजरंगचा मेहुणा निलेश सारंगधर याचा शोध पोलिस घेत होते. बजरंग याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने धक्कादायक कबुली दिली. सहा महिन्यांपूर्वी आपण मेहुणा, निलेश सारंगधर याचा गळा दाबून खून केला आणि पत्नीच्या मदतीने त्याचा मृतदेह दवणगाव येथील घराजवळ पुरला, हे आरोपी बजरंगने पोलिसांसमोर कबूल केलं.
ते ऐकून पोलिसंही हादरले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बजरंग साळुंखे याला घटनास्थळी नेत मृतदेह उकरून काढला आणि जागेवरच शवविच्छेदन केले. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा पोलिसांकडूनत तपास सुरू असतानाच, अचानक खुनाचा उलगडा झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.