Mahad Accident : महाड एमआयडीसीमध्ये खड्ड्याने घेतला एकाचा बळी, महिला गंभीर जखमी

| Updated on: Jul 29, 2022 | 5:24 PM

या अपघाताने ग्रामीण भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासन हे खड्डे कधी बुजवणार? आणखी किती बळींची वाट पाहणार? असे सवाल वाहनचालक व सर्वसामान्य नागरिकांकडून केले जात आहेत.

Mahad Accident : महाड एमआयडीसीमध्ये खड्ड्याने घेतला एकाचा बळी, महिला गंभीर जखमी
Image Credit source: TV9
Follow us on

महाड : मुंबईसह ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हे खड्डे (Pothole) जिवावर बेतत असल्याचे रायगड जिल्ह्यातील एका घटनेतून स्पष्ट झाले आहे. महाड औद्योगिक क्षेत्रात खड्ड्यांमुळे दोन वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. त्यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू (Death) झाला, तर त्याच दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी (Injured) झाली आहे. केवळ खड्ड्यांमुळे एका निष्पाप दुचाकीस्वाराला प्राणास मुकावे लागले. त्यामुळे या घटनेबाबत महाड औद्योगिक क्षेत्रासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्ञानेश्वर प्रभाकर फडतरे असे मयत व्यक्तीचे तर वर्षा ज्ञानेश्वर फडतरे असे जखमी महिलेचे नाव आहे.

या अपघाताने ग्रामीण भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासन हे खड्डे कधी बुजवणार? आणखी किती बळींची वाट पाहणार? असे सवाल वाहनचालक व सर्वसामान्य नागरिकांकडून केले जात आहेत. प्रशासन तातडीने सर्व खड्डे बुजवावेत आणि प्रवाशांच्या जिवीताला असलेला धोका रोखावा, अशी मागणी होत आहे.

खड्डे चुकवताना गाडी स्लिप झाली आणि टेम्पोच्या चाकाखाली चिरडले

महाड औद्योगिक क्षेत्रात प्रिव्ही कारखान्यासमोर आयशर टेम्पो आणि अॅक्टिव्हा यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून दुचाकीवर मागे बसलेली एक महिला गंभीर जखमी झाली आहे. महाड औद्योगिक क्षेत्र परिसरातील रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अॅक्टिव्हावरील चालक ज्ञानेश्वर फडतरे हे रस्त्यावरील खड्डे चुकवत गाडी चालवत होते. यावेळी त्यांची गाडी घसरली आणि मागच्या बाजूने येणाऱ्या आयशर टेम्पोच्या चाकाखाली येऊन ते जागीच ठार झाले. अॅक्टिव्हावर मागे बसलेली त्यांची पत्नी वर्षा फडतरे ही गंभीर जखमी झाली. त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष ही स्थिती जैसे थे असल्याने सातत्याने अपघात होत आहे. खड्ड्यांमुळे आणि पार्किंग असलेल्या गाड्यामुळे आज पुन्हा एक बळी घेतल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला. (Husband dies, woman seriously injured in pothole accident in Mahad MIDC)

हे सुद्धा वाचा