पत्नीला अद्दल घडवायला गेला पण… , पुढे जे घडले ते भयंकरच !

पती-पत्नीत काही कारणाने वाद झाला. वादानंतर पतीने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पतीने पत्नीला अद्दल घडवण्याच्या नादात जे केले त्याने नातेवाईकांसह शेजारीही होरपळले.

पत्नीला अद्दल घडवायला गेला पण... , पुढे जे घडले ते भयंकरच !
जमिनीच्या वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 3:20 PM

गाझियाबाद : पती-पत्नीमध्ये काही कारणातून काल रात्री वाद झाला. या वादातून पत्नीला संपवण्याच्या हेतूने पतीने घरातील गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर सुरु केले. यामुळे संपूर्ण घरात गॅस पसरला. पत्नीच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने जोरदार आरडाओरजा केला. पत्नीचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक आणि शेजारी धावत आले आणि रेग्युरेटर बंद केले. मात्र पतीने लाईटर पेटवल्याने घरभर पसरलेल्या गॅसमुळे आग लागली. संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी गेले. यात पत्नीसह मदतीसाठी आलेले नातेवाईक आणि शेजारी असे 10 लोक होरपळले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पतीने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली मग…

लोणी क्षेत्रातील टिळक नगर कॉलनीत ही घटना घडली. सुरेश असे आग लावणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, सुरेशने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. रागाच्या एलपीजी गॅस पाईप ओढला, ज्यामुळे खोलीत गॅस भरला. गॅस पसरल्यावर रितूने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य तेथे पोहोचले आणि त्यांनी गॅसचे रेग्युलेटर बंद केले. दरम्यान, सुरेशने गॅस लायटर लावल्याने खोलीला आग लागली आणि घरातील साहित्य जळून खाक झाले.

जखमींवर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरु

सर्व जखमींना ईशान्य दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नातेवाईकांचा आरोप आहे की, आरोपीचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध असल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. कुटुंबीयांची लेखी तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.