धक्कादायक! पतीची ती गोष्ट बायकोला कळताच त्याने पत्नीला जीवंत जाळलं, घटनेनं खळबळ

उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ही घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबादची आहे.

धक्कादायक! पतीची ती गोष्ट बायकोला कळताच त्याने पत्नीला जीवंत जाळलं, घटनेनं खळबळ
Crime
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Mar 17, 2025 | 8:30 PM

उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ही घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबादची आहे. एक पती आपल्या पत्नीपासून दूर राहू लागला होता.पती आपल्यापासून दूर का राहातो? ही गोष्ट त्याच्या बायकोला सारखी खटकत होती. ती त्याबद्दल त्याच्याकडे विचारणा देखील करत होती, मात्र तो कधीच खरं कारण सांगत नव्हता. उडवाउडवीची उत्तर देत होता. मात्र एक दिवस दोघा पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडणं झालं, रागाच्या भरता पुन्हा एकदा पत्नीने त्याला कारण विचारलं यावेळी मात्र त्याने खरं कारण सांगितलं ते एकताच महिलेच्या पायाखालची जमीनच सरकरली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न देखील केला. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना गाझियाबाद लोनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मुस्तफाबाद कॉलनीमध्ये घडली आहे. आरोपी पती आपल्या पत्नीपासून दूर -दूर राहत होता. एक दिवस जेव्हा त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं तेव्हा पतीने पत्नीला त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितलं. त्यानंतर त्यांच्यातील वाद आणखी वाढला आणि त्यानंतर पतीने महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पत्नी गंभीर जखमी झाली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 16 मार्च रोजी घडली आहे. मुस्ताफाबाद परिसरात एक महिला आपल्या पतीसोबत राहत होती. घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर पतीने आपल्या पत्नीला पेट्रोल टाकून पेटून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

या प्रकरणात ही महिला 40 ते 45 टक्के भाजली आहे. सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.