
पती-पत्नीचं नातं विश्वासावर आधारित असतं, पण या नात्याची वीण खूप नाजूक असते. पती किंवा पत्नीपैकी कोणीही या विश्वासाला धक्का लावला तर नात्याची ही वीण तुटते आणि मग आयुष्भर ती सांधता येत नाही. सांधलीच तरी त्यात एक गाठ तर पडतेच, म्हणजेच आधीसारंख, काहीच रहात नाही. त्यामुळे विश्वास हात नात्याचा पाया असतो आणि तो प्रत्येकाने जपला पाहिजे. नाहीतर ते होतं त्याने फक्त पश्चाताप हाथी उरलतो. मध्य प्रदेशच्या मुरैनमध्येही असंच काहीसं घडलं, पत्नीच्या दगाबाजीमुळे एक पती एवढा दु:खी झाला की त्याने थेट विषप्राशन केलं. यामध्ये त्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला असता हे प्रकरण अवैध प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी महिलेला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. हे प्रकरण अंबा परिसरातील वॉर्ड क्रमांक 7 चे आहे. येथे बिहार कॉलनीत राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत विष प्राशन करून आत्महत्या केली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
नेमकं काय झालं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता संतोष शर्मा (वय 40) यांच्या घशात आणि छातीत दुखू लागले. त्यांची पत्नी आणि तिचा प्रियकर मुकेश कुशवाह, हे त्यांना उपाचारांसाठी बरेह येथून मोरेना जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. मात्र तेथे तपासून डॉक्टरांनी संतोष यांना मृत घोषित केले. त्यानंतर पत्नी आणि तिचा प्रियकर, हे दोघे संतोषला ग्वाल्हेरला घेऊन गेले. तिथेही डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. मृताचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा प्रथमदर्शनी विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले.
प्रियकराने काढला होता पत्नीचा टॅटू
तपासादरम्यान पोलिसांना संतोष यांची पत्नी आणि तिचा प्रियकर मुकेश कुशवाहावर संशय आला. पोलिसांनी दोघांचीही चौकशी केली. त्यांचे मोबाईल तपासले असता मृताची पत्नी आणि आरोपी मुकेश कुशवाह यांचे प्रेमसंबंध असल्याचे स्पष्ट झाले, दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, ते एकमेकांशी तासनतास चॅट करायचे. पोलिसांनी मोबाईलमधील चॅट आणि ऑडिओ देखील जप्त केले आहेत. आरोपी मुकेश कुशवाहा मृताच्या पत्नीवर प्रेम करत होता आणि म्हणूनच त्याने तिच्या हातावर तिच्या चेहऱ्याचा टॅटू गोंदवला.
जेव्हा संतोषने मुकेशच्या हातावर पत्नीचा टॅटू पाहिला तेव्हा तो संतापला. घरी याबद्दल खूप वाद होत होते. पण तरीही त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत बोलत असे. त्यांचे प्रेमसंबंध असेच चालू राहिले. यामुळेच संतोषने निराशेतून विष प्राशन केले. पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिचा प्रियकर मुकेश कुशवाहा यांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे.