Husband-Wife Dispute : बळजबरी केल्याने वाद विकोपाला गेला, संतापलेल्या पत्नीने पतीचा ‘हा’ अवयव कापला !

पत्नीच्या आईचे निधन काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. आईच्या निधनामुळे पत्नी मानसिक तणावात होती. याच दरम्यान पती तिच्यावर शारीरिक संबंध ठेवू इच्छित होता. मात्र ती वारंवार मनाई करुनही पती बळजबरी करत होता.

Husband-Wife Dispute : बळजबरी केल्याने वाद विकोपाला गेला, संतापलेल्या पत्नीने पतीचा हा अवयव कापला !
फोनला उत्तर देत नव्हती म्हणून प्रेयसीवर अत्याचार
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 28, 2023 | 7:14 PM

लखनऊ : पती-पत्नीमधील वाद-विवादाच्या घटना नेहमीच आपण ऐकतो. मात्र उत्तर प्रदेशात पती-पत्नीच्या वादातून एक विचित्र घटना घडल्याचे समेर आले आहे. वारंवार मनाई करुनही पती बळजबरी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याने संतापलेल्या पत्नीने पतीची जीभच कापल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे घडली आहे. जखमी पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्नी काही दिवसांपासून तणावात होती. यातच पतीने शरीरसंबंध ठेवण्यासाठी बळजबरी केल्याने ती संतापली आणि तिने पतीला अद्दल घडवण्यासाठी हे कृत्य केले.

पत्नी काही दिवसांपासून मानसिक तणावात होती

पत्नीच्या आईचे निधन काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. आईच्या निधनामुळे पत्नी मानसिक तणावात होती. याच दरम्यान पती तिच्यावर शारीरिक संबंध ठेवू इच्छित होता. मात्र ती वारंवार मनाई करुनही पती बळजबरी करत होता. यामुळे संतापलेल्या पत्नीने पतीची जीभच कापली.

पत्नीविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी पत्नीविरोधात कलम 326 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. सध्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.