Mumbai : हैदराबादी प्रमियम बाईक चोरट्याला मुंबई पोलिसांनी केली अटक, 15 ते 20 लाखांच्या दोन दुचाकी जप्त

| Updated on: Jul 22, 2022 | 7:55 PM

मुंबईतील चारकोप पोलिसांनी अशा एका दुचाकी चोराला अटक केली आहे. तो कोणतीही प्रमियम महागडी बाईक दिसली की त्यांच्याकडे ट्रायल मागायचा आणि तिथून पळ काढायचा.

Mumbai : हैदराबादी प्रमियम बाईक चोरट्याला मुंबई पोलिसांनी केली अटक, 15 ते 20 लाखांच्या दोन दुचाकी जप्त
हैदराबादी प्रमियम बाईक चोरट्याला मुंबई पोलिसांनी केली अटक, 15 ते 20 लाखांच्या दोन दुचाकी जप्त
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई – प्रमियम बाईक (Premium Bike) दिसली की त्याची तारिफ करायची, तो खूश झाला की गाडी चालवायला मागायची आणि तिथून पसार व्हायचं. असं करणाऱ्या हैदराबादी प्रमियम बाईक चोरट्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केली अटक केली आहे. ज्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी 15 ते 20 लाखांच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा आरोपी मुंबईतील चारकोप परिसरात राहत होता. चारकोप पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले आहे. जुबेर इरफान सय्यद (Juber Sayyad) असे आरोपीचे नाव असून तो २४ वर्षांचा असून तो हैदराबादचा रहिवासी असून मुंबईतील एका हॉटेलमध्ये राहतो.

ओशिवरा येथेही आलिशान महागड्या दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल

मुंबईतील चारकोप पोलिसांनी अशा एका दुचाकी चोराला अटक केली आहे. तो कोणतीही प्रमियम महागडी बाईक दिसली की त्यांच्याकडे ट्रायल मागायचा आणि तिथून पळ काढायचा. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुबेर इरफान सय्यद असे आरोपीचे नाव असून तो २४ वर्षांचा असून तो हैदराबादचा रहिवासी असून मुंबईतील एका हॉटेलमध्ये राहतो. ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध मुंबईतील चारकोप वांद्रे आणि ओशिवरा येथेही आलिशान महागड्या दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने कुणालाही प्रिमियम महागडी दुचाकी दिसली तर त्याला थांबवून त्याचे कौतुक करायचा नंतर त्याच्या दुचाकीची ट्रायल विचारायचा आणि समोरची महागडी आलिशान दुचाकी घेऊन तो फरार व्हायचा अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिस कसून चौकशी करीत आहेत

याप्रकरणी चारकोप पोलिसांनी चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या असून त्यांची किंमत सुमारे 15 ते 20 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितले की, त्याला महागड्या आणि आलिशान दुचाकी चालवण्याचा शौक आहे आणि हा शौक पूर्ण करण्यासाठी तो महागड्या आणि आलिशान दुचाकी चोरतो. सध्या चारकोप पोलिस त्याची कसून चौकशी करीत असून त्याने आतापर्यंत किती महागड्या दुचाकी चोरल्या आहेत. त्याचबरोबर चोरलेल्या गाड्यांचे तो काय करतो. तसेच या कटात आणखी कितीजण समील आहेत याची चौकशी करीत आहेत.