अनैतिक संबंधाला पत्नी विरोध करायची, जवानाने दोन निष्पापांसह पत्नीला जिवंत…

सुखाचा संसार असताना तो दुसऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला. पत्नीला ही बाब कळताच तिने विरोध करण्यास सुरुवात केली. मग त्याने स्वतःच्या जन्म दिलेल्या लेकरांचाही विचार केला नाही.

अनैतिक संबंधाला पत्नी विरोध करायची, जवानाने दोन निष्पापांसह पत्नीला जिवंत...
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीसह मुलांना जिवंत जाळले
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 06, 2023 | 5:26 PM

मुजफ्फरपूर : बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये अतिशय निंदनीय आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. देशाचा रक्षकच कुटुंबाचा भक्षक बनला आहे. अनैतिक संबंधाला विरोध करायची म्हणून आर्मीच्या जवानाने पत्नीसह दोन मुलांना जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पती आणि सासू-सासरे फरार आहेत. हिमांशु कुमार असे आरोपी जवानाचे नाव आहे. शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. सोनल प्रिया असे पीडित पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

अनैतिक संबंधाला पत्नी विरोध करत होती

हिमांशु आणि सोनलचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना आठ वर्षाची मुलगी आणि दोन महिन्यांचा मुलगा होता. हिमांशुचे दुसऱ्या तरुणीसोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरु होते. सोनल याला विरोध करीत होती. यामुळे हिमांशुने आपल्या आई-वडिलांसोबत मिळून तिचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार रात्री पत्नी आणि मुलं पलंगावर गाढ झोपली होती. यावेळी हिमांशुने पलंग पेटवून दिला. आग लागताच पत्नीला जाग आली आणि तिने पलंगावरुन उठण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने तिला पुन्हा आगीत ढकलले.

पत्नी-मुलांना जाळल्यानंतर पती आणि सासू-सासरे फरार

आगीत पत्नी आणि मुलांचा जळून मृत्यू झाला. यानंतर पतीसह सासू-सासरे फरार झाले. शेजाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मायलेकरांचे जळालेले मृतेदह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध सुरु केला आहे.