सरस्वती पूजेसाठी वर्गणी मागितली 1 हजार रुपये, त्याने दिले 20 रुपये; तरुणांनी ड्रायव्हरसोबत केले ‘असे’ कृत्य

आशाबीघा गावात मयत रविंद्र राहतो. विजयपूर गावाजवळ जुगाड गाडी थांबवून सरस्वती पूजेच्या नावाखाली आरोपींनी रविंद्रकडे एक हजार रुपये मागितले. मात्र रविंद्रने केवळ 20 रुपयेच दिले.

सरस्वती पूजेसाठी वर्गणी मागितली 1 हजार रुपये, त्याने दिले 20 रुपये; तरुणांनी ड्रायव्हरसोबत केले असे कृत्य
जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 26, 2023 | 7:03 PM

नवादा : इच्छित वर्गणी न दिल्याने बिहारमधील नवादा येथे एका ड्रायव्हरची मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविंद्र राजवंशी असे हत्या करण्यात आलेल्या 26 वर्षीय ड्रायव्हरचे काम आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींमध्ये 12 ते 15 जणांचा समावेश आहे. नवादा पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

एक हजार रुपये वर्गणी मागितली

आशाबीघा गावात मयत रविंद्र राहतो. विजयपूर गावाजवळ जुगाड गाडी थांबवून सरस्वती पूजेच्या नावाखाली आरोपींनी रविंद्रकडे एक हजार रुपये मागितले. मात्र रविंद्रने केवळ 20 रुपयेच दिले.

वर्गणी न दिल्याने ड्रायव्हरला बेदम मारहाण

यामुळे चिडलेल्या 12 ते 15 युवकांनी रविंद्रला बेदम मारहाण केली. या मारहाणीत रविंद्र बेशुद्ध झाला. तात्काळ त्याला उपचारासाठी सदर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मारहाणीत मुका मार लागल्याने रविंद्रचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून एका आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच नवादा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करत एका आरोपीला अटक केली आहे. अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

दिल्लीत मोबाईलसाठी तरुणाची हत्या

मोबाईल खेचत असताना तरुणाने विरोध केला म्हणून अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेत त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.