Pune Crime : नोकरीचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी

महिलेला धमकी देत तिच्याकडून 1 लाख रुपयाची खंडणीही मागितली. तसेच यातील तिसऱ्या आरोपीने महिलेला वारंवार धमकावले. या सगळ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

Pune Crime : नोकरीचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी
महिलेवर अत्याचार करुन धमकावणाऱ्या आरोपींना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 5:55 PM

पुणे : ऑनलाईन सामानाची डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीत नोकरी लावतो असे आमिष दाखवत एका महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ खान, रवी आणि रियाज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यात या तीन जणांविरोधात भारतीय दंडात्मक कलम 376 (2), 506, 384, 323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै 2022 ते ऑगस्ट 2022 दरम्यान महिलेसोबत हा प्रकार घडला.

डिलिव्हरी गर्लचे काम असल्याचे सांगत बोलावले

मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ खान याने पीडित महिलेला तो तिच्या पतीचा मित्र आहे, असं सांगून ऑनलाईन डिलिव्हरी ॲपमध्ये नोकरी लावून देतो असे सांगितले. डिलिव्हरी गर्ल म्हणून काम लावून देतो असे सांगत आरिफने पीडित महिलेला एक डिलिव्हरी करायची आहे सांगत बोलावले.

लॉजवरुन नेऊन अत्याचार केला

मग त्याने त्या महिलेला एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले. या सगळ्या बाबत कोणाला काही सांगितले तर फोटो व्हायरल करेन, अशी धमकी यातील दुसरा आरोपी रवीने त्या महिलेला दिली.

हे सुद्धा वाचा

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळली

महिलेला धमकी देत तिच्याकडून 1 लाख रुपयाची खंडणीही मागितली. तसेच यातील तिसऱ्या आरोपीने महिलेला वारंवार धमकावले. या सगळ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.