प्रॉपर्टी हडपण्यासाठी प्रियकराची मदत, सासरचं संपूर्ण कुटुंबचं संपवलं, रचलेला प्लॅन पाहून पोलिसांनाही बसला धक्का

सुनेला सासू-सासऱ्यांच्या पैशाचा लोभ झाला. मग पैसे आणि दागिने लुटण्यासाठी तिने मास्टर प्लान बनवला. हा प्लान यशस्वीही झाला. पण म्हणतात कानून के हाथ लंबे होते है !

प्रॉपर्टी हडपण्यासाठी प्रियकराची मदत, सासरचं संपूर्ण कुटुंबचं संपवलं, रचलेला प्लॅन पाहून पोलिसांनाही बसला धक्का
पैशासाठी सुनेने सासू-सासऱ्यांना संपवले
Image Credit source: Google
| Updated on: Apr 11, 2023 | 3:08 PM

दिल्ली : दिल्लीतील गोकुळपुरी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले आहे. दिल्ली पोलिसांनी वृद्ध जोडप्याच्या हत्येप्रकरणी त्यांच्या सुनेला अटक केली आहे. सुनेने प्रियकरासह सासू आणि सासऱ्यांना संपवण्याचा कट रचून हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. सध्या सुनेचा प्रियकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राधेश्याम आणि वीणा अशी मयत जोडप्याची नावे आहेत. राधेश्याम हे उपप्राचार्य पदावरुन निवृत्त झाले आहेत. हत्येनंतर सुनेचा प्रियकर दागिने आणि पैसे घेऊन फरार झाला.

सकाळी मुलगा उठला तर आई-वडिलांचे मृतदेह दिसले

मृत राधेश्याम आणि त्यांची पत्नी वीणा रविवारी रात्री कुटुंबातील इतर सदस्यांना भेटल्यानंतर तळमजल्यावर झोपायला गेले होते. सोमवारी सकाळी राधेश्यामचा मुलगा उठला तेव्हा त्याला आई-वडिलांचे रक्ताने माखलेले मृतदेह बेडवर पडलेले दिसले. यासोबतच घरातील सामानही अस्ताव्यस्त पडले होते. घराचा मागील दरवाजाही उघडा होता.

यानंतर त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. राधेश्याम हे एका सरकारी शाळेतून उपमुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले होते.

प्रियकराला आधीच छतावर लपवून ठेवले

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुनेने आधीच हत्येचा कट रचला होता. त्यानुसार तिने रविवारी सायंकाळी उशिरा प्रियकराला घरी बोलावून टेरेसवर लपवून ठेवले. कुटुंबातील सर्वजण झोपी गेल्यानंतर आरोपी महिलेने प्रियकरासोबत मिळून रात्री उशिरा सासू आणि सासऱ्याची हत्या केली. त्यानंतर प्रियकर घरातून दागिने आणि पैसे घेऊन पळून गेला. किंबहुना घरात बऱ्यापैकी रक्कम ठेवली आहे याची सुनेला माहिती होती. यामुळे प्रियकरासह तिने सासू आणि सासऱ्याच्या हत्येचा कट रचला.

हत्येचा तपास करत असताना पोलिसांना सुनेवर संशय आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सुनेला अटक केली असून, तिचा प्रियकर फरार आहे. पोलीस फरार प्रियकराचा कसून शोध घेत आहेत.