AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी बायकोला मारून आलोय… ते 4 शब्द ऐकताच पोलीसही हादरले; सुखी संसारात असं काय घडलं?

कल्याणमध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून विशाल भुतकरने पत्नी अर्चनाचा गळा आवळून खून केला. गुन्हा केल्यानंतर तो स्वतः नाशिकला गेला आणि पोलिसांसमोर कबूल झाला. 'मी बायकोला मारून आलोय' हे त्याचे शब्द ऐकून पोलीसही हादरले. या घटनेने त्यांच्या दोन मुलांवर मोठा आघात झाला आहे.

मी बायकोला मारून आलोय... ते 4 शब्द ऐकताच पोलीसही हादरले; सुखी संसारात असं काय घडलं?
क्राईम न्यूज
| Updated on: Mar 13, 2026 | 2:30 PM
Share

नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर चालतं. लग्नात दोघंही एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतात. एकमेकांच्या विश्वासाला तडा न देण्याचं वचन देतात. आणि एकमेकांच्या सुखदु:खात खंबीरपणे एकमेकांना साथ देण्याचं वचनही देतात. पण लग्नानंतरचं आयुष्य साधसोपं राहतं असंच नाही. कधी कधी दोघांपैकी एकजण भ्रमात जातो. आणि त्यातून वादाला सुरुवात होते. रोजच्या कटीकटीने आयुष्य नको नको होऊन जातं. आणि रोजची कटकट एक दिवस गंभीर गुन्ह्याला जन्म देते. कल्याणमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे.

कल्याणवरून एक आरोपी नाशिकला गेला. संपूर्ण प्रवासात डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. नाशिकला उतरताच तो नाशिक पोलीस ठाण्यात गेला. मी बायकोला मारून आलोय, असं त्याने पोलिसांना थेट सांगितलं. समोरच्या व्यक्तीच्या तोंडचे हे शब्द ऐकून कामात व्यस्त असलेले पोलीसही हादरले. अत्यंत निर्विकार चेहऱ्याने संशयित आरोपीने कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली. त्यानंतर त्याने पोलिसांना सर्व काही सांगितलं. त्याने जे सांगितलं त्यामुळे पोलीसही हादरून गेले.

कल्याणमध्ये घटना

विशाल भुतकर असं या आरोपीचं नाव आहे. तो कल्याणच्या उंबर्डे येथे राहतो. उंबर्डे येथे त्याने पत्नी अर्चना हिचा गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तो नाशिकला गेला आणि नाशिक पोलीस ठाण्यात जाऊन त्याने सर्व कबुली दिली. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून तिची गळा दाबून हत्या केल्याचं त्याने सांगितलं. विशाल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. दोघांमध्ये त्यावरून वाद व्हायचे. गेल्या अनेक महिन्यांपासून घरात वाद सुरू होते. कटकटी वाढत होत्या. त्यातून त्याने रागाच्या भरात अत्यंत वाईट कृत्य केलं. भुतकर यांना दोन मुलं आहेत. आई हयात नाही आणि वडील तुरुंगात… अशी अवस्था आता या दोन्ही मुलांची झाली आहे.

आधी भावाला सांगितलं…

विशाल आणि अर्चना यांच्यात सारखे वाद होत असल्याने तो दुसरीकडे गेला होता. गुन्ह्याच्या दिवशी विशाल उंबर्डेला आला. तिथे दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्याचवेळी त्याने अर्चनाचा गळा दाबून तिचा खून केला आणि नाशिकला पळून गेला. नाशिकला आल्यावर त्याने सर्वात आधी भावाला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर त्याचा भाऊ त्याला नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात घेऊन आला. माझा भाऊ काय सांगतो ते नीट ऐका, असं त्याने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर विशालने बोलायला सुरुवात केली. मी बायकोचा खून करून आलोय, हे पहिलंच वाक्य त्याने उच्चारलं आणि पोलिसांच्याही पायाखालची जमीन हादरली. त्यानंतर विशालने सर्वच सांगून टाकलं.

विशालने जे सांगितलं त्यावर पोलिसांचा विश्वास बसला नाही. त्यामुळे पोलिसांनी थेट कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना फोन लावून खातरजमा करायला सांगितलं. कल्याण पोलिसांनी खातरजमा करून अर्चनाचा खून झाल्याचं सांगितलं. त्यानंतर नाशिक पोलिसांनाही खात्री पटली आणि विशालला ताब्यात घेण्यात आलं.

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!