Dombivli : डोंबिवलीत कार चालकाने पोलिस कर्मचाऱ्याला नेलं फरफटत, घटना सीसीटिव्हीत कैद

| Updated on: Jul 14, 2022 | 7:19 AM

ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. कारचालकाने एका रिक्षाचालकाला देखील धडक दिली असून रिक्षाचालक सुद्धा जखमी झाला आहे.

Dombivli : डोंबिवलीत कार चालकाने पोलिस कर्मचाऱ्याला नेलं फरफटत, घटना सीसीटिव्हीत कैद
घटना सीसीटिव्हीत कैद
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

डोंबिवली – डोंबिवली (Dombivli) धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली स्टेशन जवळील एस.के.पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे (Balasaheb Hore) हे आपले कर्तव्य बजावत असतानाच काळी काच आणि मोठ्याने डेक लावलेल्या एका गाडी चालकाला थांबवायचा प्रयत्न केला. पण त्या गाडीचालकाने त्यांना फरफटत नेले. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून वाहतूक पोलिसांच्या (Mumbai Police) तक्रारीनंतर रामनगर पोलीसानी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. ही घटना अनेकांच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्या पायाला आणि हाताला जखम झाली आहे.

नेमकं काय झालं

डोंबिवली स्टेशन जवळील एस.के.पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे हे आपले कर्तव्य बजावत होते. त्यावेळी होरे यांना एक गाडी संशयास्पद वाटायला लागली. त्यांनी ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या गाडीने त्यांना फरफटत नेले. ही बुधवारी संध्याकाळी 6.30च्या सुमारास घडली आहे. गाडीला काळ्या काचा आणि मोठ्याने डेक लावला असल्याने हवालदार होरे यांनी गाडी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा दिला. पण चालकाने गाडी न थांबवता होरे यांच्या अंगावर घातली. होरे यांनी गाडीचे बोनेट पकडले असता चालकाने त्यांना फरफटवत गाडी चिपळूणकर रोड मार्गे बालभवन पर्यंत नेली. तेथे होरे यांना गाडीवरून खाली पाडत चालकाने पुन्हा मागे गाडी वळवून तेथून पळ काढला.

ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. कारचालकाने एका रिक्षाचालकाला देखील धडक दिली असून रिक्षाचालक सुद्धा जखमी झाला आहे. होरे यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडी चालकावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.