आधी पिझ्झा ऑर्डर केला, आईला भाकऱ्या बनविल्या आणि मुलीने स्वत:ला संपवले

या तरुणाची या मुलीशी एका नातेवाईकाच्या घरी भेट झाली होती. दोघेही नात्यात दूरचे भाऊ आणि बहीण लागतात. त्यांच्यात मैत्री होऊन ते रोज फोनवर बोलू लागले. मग त्यांची मैत्री अधिकच घट्ट झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले...

आधी पिझ्झा ऑर्डर केला, आईला भाकऱ्या बनविल्या आणि मुलीने स्वत:ला संपवले
| Updated on: Apr 05, 2025 | 8:12 PM

दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने आपल्या कथित पतीशी विलग झाल्याने स्वत:ला संपवले आहे. या तरुणीने या तुरुणाशी लग्न केले होते की नव्हते हे मात्र स्पष्ट झालेले नाही. या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल झालेला नाही. परंतू पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

दिल्लीतील द्वारका परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचे तिच्या दूरच्या नातेवाईकाबरोबर जुळले होते. या दोघांनी लपून लग्न केल्याचे म्हटले जात आहे. परंतू २३ मार्च रोजी या तरुणीने घरात स्वत:ला संपवले आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही चिट्टी वगैरे काही सापडलेले नाही.त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता लोकांची जबाब आणि इतर पुराव्यानुसार होणार आहे.

या तरुणीने त्या मुलाशी नाते तोडले होते. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्याच कारणाने तिने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. जेव्हा तिने स्वत:ला लटकवले तेव्हा घरात कोणीही नव्हते. पोस्ट मार्टेमनंतर पोलिसांनी तरुणीचा मृतदेह घरच्यांना सोपवला आहे. तपासात या तरुणीने स्वत:ला संपवण्याआधी पिझ्झा ऑर्डर केला होता, तसेच आईला भाकऱ्या देखील बनवून दिल्या होत्या त्यानंतर तिने स्वत:ला अशा प्रकारे संपवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या दोघांचे लग्न केले होते का याचा तपास पोलीस करीत आहेत. कारण एका फोटोत मुलगा मुलीच्या भांगेत कुंकु भरताना दिसत आहे. सर्वांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

जास्त सुंदर दिसू नये म्हणून केस कापले

मुलीच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याबद्दल कल्पना नसल्याचा दावा केला जात आहे. परंतू पोलिस सूत्रांनुसार, घरातल्या सर्वांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती होती. एकदा, मुलीला तिच्या कथित पतीने ती अधिक सुंदर असल्याने ती त्याला सोडून जाऊ शकते असा संशय व्यक्त केला होता.त्यामुळे तिने रागाने स्वत:चे सर्व केस कापले होते.आपण आपल्या प्रियकरापेक्षा जास्त सुंदर दिसू नये , म्हणून तिने सर्व केस कापले होते.