मोठ्या विश्वासाने पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या महिलेच्या हाती इन्स्पेक्टरने दिली हॉटेल रुमची चावी

अलीकडे या इन्स्पेक्टरने महिलेला फोन करुन तिला पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगितलं. महिला पोलीस ठाण्यात गेली, तेव्हा या इन्स्पेक्टरने तिला ड्राय फ्रुटसचा बॉक्स दिला व सोबत हॉटेल रुमची चावी दिली.

मोठ्या विश्वासाने पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या महिलेच्या हाती इन्स्पेक्टरने दिली हॉटेल रुमची चावी
Hotel room
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 3:21 PM

बंगळुरु : एक पोलीस इन्स्पेक्टर त्याच्या वर्तनामुळे अडचणीत सापडला आहे. फसवणुकीच्या प्रकरणात मदत मागायला गेलेल्या महिलेबरोबर त्याने गैरवर्तन केलं. महिलेने या संदर्भात IPS अधिकाऱ्याकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणात खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या महिलने एका बिझनेसमनला 15 लाख रुपये दिले होते. बिझनेसमन हे पैसे परत करत नव्हता. ते पैसे परत मिळवण्यासाठी पोलिसांची मदत मागण्यासाठी म्हणून महिला पोलीस ठाण्यात गेली होती.

पोलीस इन्स्पेक्टरने महिलेची तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर तो व्यक्तीगत मोबाइल नंबरवरुन तिला मेसेज करु लागला. या प्रकारामुळे महिला भांबावून गेली. काय कराव हे तिला सुचत नव्हतं. तिने त्याच्या कुठल्याही मेसेजला प्रतिसाद दिला नाही. कर्नाटकात बंगळुरुच्या एका पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.

तिला ड्राय फ्रुटसचा बॉक्स दिला

अलीकडे या इन्स्पेक्टरने महिलेला फोन करुन तिला पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगितलं. महिला पोलीस ठाण्यात गेली, तेव्हा या इन्स्पेक्टरने तिला ड्राय फ्रुटसचा बॉक्स दिला व सोबत हॉटेल रुमची चावी दिली.

राग शांत करण्याचा प्रयत्न

“इन्स्पेक्टरने वस्तू देऊ केल्या, तेव्हा मला धक्का बसला. मी त्या वस्तू घेण्यास नकार दिला व तडक पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली” असं महिलेने सांगितलं. महिला पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यातून माझा राग शांत करण्याचा प्रयत्न झाला. पण त्याचा उपयोग झाला नाही, असं तक्रारदार महिलेने सांगितलं. पोलीस खात्याने या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. दरम्यान आरोपी पोलिसाला रजेवर जाण्यास सांगण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.