पत्नी दोन महिन्यांपासून माहेरी राहत होती, पतीला वाटले मेव्हणा बहिणीला भडकावतोय, मग…

पती-पत्नीमध्ये पैशावरुन वाद झाला. यानंतर पत्नी रागाने माहेरी निघून आली. पतीने अनेकदा तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण पत्नी ऐकायला तयार नव्हती. यामुळे पतीच्या मनात वेगळाच संशय निर्माण झाला.

पत्नी दोन महिन्यांपासून माहेरी राहत होती, पतीला वाटले मेव्हणा बहिणीला भडकावतोय, मग...
नागपुरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: TV9
| Updated on: May 02, 2023 | 10:53 PM

बडवाणी : मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीच्या वादात मेव्हणा जीवानीशी गेल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील बडवाणी येथे घडली आहे. पती-पत्नीमध्ये वाद झाला. यानंतर नाराज पत्नी रागाने माहेरी निघून आली. पतीने अनेक वेळा पत्नीला मनवून घरी परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नी ऐकायला तयार नव्हती. गेले दोन महिने ती माहेरीच राहत होती. मेव्हणा बहिणीली भडकावत असल्याचा संशय पतीला आला. यातून त्याने आधी मेव्हण्याशी भांडण केले, मग त्याची हत्या केली. निलेश असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. जगन असे अटक आरोपीचे नाव आहे.

बडवाणी जिल्ह्यातील पाटी गावात एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आणि घटनेचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना आरोपीचे निलेश असल्याचे कळले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला.

भावोजी आणि मेव्हणा लग्नाला गेले होते

मेव्हणा आणि भावोजी दोघेही फलिया गावात एका लग्नाला गेले होते. तेथे दोघांमध्ये वाद झाला. यावेळी मेव्हणा निलेश दारुच्या नशेत होता. यामुळे आरोपी जगन त्याला एका नाल्याजवळ घेऊन गेला आणि त्याची हत्या केली. पोलीस तापासात पोलिसांना जगनवर संशय आला. पोलिसांनी जगनला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.

लग्नात दिल्या जाणाऱ्या पैशावरुन पती-पत्नीत वाद होता

पती-पत्नीमध्ये पैशांवरून वाद सुरू होता. यामुळे जगनची पत्नी गेल्या दोन महिन्यांपासून माहेरी राहत होती. येथे लग्नाच्या वेळी मुलाकडे मुलीच्या घरच्यांना पैसे देतात. हे पैसे आरोपीच्या कुटुंबीयांनी महिलेच्या कुटुंबीयांना दिले नाही. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच रागातून पत्नी माहेरी गेली होती. जगनने पत्नीला आणण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला मात्र ती आली नाही. यामुळे जगनला संशय होता की, मेव्हणा नीलेश आपल्या पत्नीला भडकावत ​​आहे, त्यामुळे ती तिच्या माहेरून येत नव्हती.