वडिलोपार्जित घराच्या जागेचा वाद टोकाला गेला, चुलत भावानेच मित्रांच्या मदतीने भावाचा काटा काढला !

वडिलोपार्जित घराच्या जागेवरुन चुलत भावांमध्ये वाद होता. याच वादातून चुलत भावाने मित्रांसह भावाला गाठले. मग जे घडले ते भयंकर होते.

वडिलोपार्जित घराच्या जागेचा वाद टोकाला गेला, चुलत भावानेच मित्रांच्या मदतीने भावाचा काटा काढला !
जागेच्या वादातूून दोघा तरुणांना संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 10:07 PM

विवेक गावंडे, यवतमाळ : वडिलोपार्जित घराच्या जागेच्या हिस्स्यावरुन दोन तरुणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये उघडकीस आली आहे. यवतमाळ ते कोळंबी फाटा दरम्यान आढळलेल्या दोन अनोळखी मृतदेहांची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे. अविनाश हनुमंत कटरे आणि उज्वल नारायण छापेकर अशी मयत तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी विकास रामचंद्र हौसकर यांच्या फिर्यादीवरुन यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांची सखोल चौकशी करत आहेत.

तपासात मयताचा चुलत भावासोबत जागेचा वाद असल्याचे कळले

आरोपींची ओळख पटताच पोलिसांनी तात्काळ पाच पथकं गठीत करुन प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना अविनाश कटरे याचा पाटापांगरा गावातील वडिलोपार्जित घराच्या जागेवरुन चुलत भावाशी वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गावात दाखल होत चौकशी केली असता अविनाश कटरे आणि त्याचा मित्र उज्वल छापेकर हे दोघे गावात आल्याचे कळले. तसेच जागा खाली करण्यावरुन त्यांचा चुलत आजीसोबत वाद आणि धक्काबुक्की झाल्याचेही पोलिसांना कळले. यानंतर अविनाश आणि उज्वल दोघेही यवतमाळकडे गेले.

संशयित आरोपीला ताब्यात घेतले असता गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी अविनाशचा चुलत भाऊ विकासची माहिती काढली असता तो ही यवतमाळ, गळवा येथे गेल्याची माहिती मिळाली. यामुळे संशयाची सुई विकासवर असल्याने पोलिसांनी गळवा गाव गाठत विकासला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत विकासने जागेच्या वादातून आपल्या दोन मित्रांच्या मदतीने अविनाश आणि त्याच्या मित्राची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. विकास लालचंद कटरे, भारत दिगंबर गाडेकर आणि गजानन रामराव मोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.