300 रुपयांसाठी सख्खा भाऊ बनला पक्का वैरी, मोठ्याने छोट्यासोबत जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला !

| Updated on: Dec 16, 2022 | 2:21 PM

सुमन काकोडिया याने आपला मोठा भाऊ रमेश काकोडिया याच्याकडून 300 रुपये उधार घेतले होते. याच पैशांवरुन त्याचे रमेशसोबत भांडण झाले. मग या भांडणाचे मारामारीत रुपांतर झाले.

300 रुपयांसाठी सख्खा भाऊ बनला पक्का वैरी, मोठ्याने छोट्यासोबत जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला !
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवले
Image Credit source: Google
Follow us on

बैतूल : केवळ 300 रुपयांवरुन झालेल्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बैतूल येथे घडली आहे. भावाची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. सुमन सिंह काकोडिया असे हत्या करण्यात आलेल्या भावाचे नाव आहे. तर रमेश काकोडिया असे हत्या करणाऱ्या मोठ्या भावाचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

काय आहे प्रकरण?

सुमन काकोडिया याने आपला मोठा भाऊ रमेश काकोडिया याच्याकडून 300 रुपये उधार घेतले होते. याच पैशांवरुन त्याचे रमेशसोबत भांडण झाले. मग या भांडणाचे मारामारीत रुपांतर झाले. यावेळी रमेशने सुमनच्या डोक्यात पाईपने वार केला. यात सुमनचा मृत्यू झाला.

दोघेही भाऊ दारुच्या नशेत होते

दोघेही भाऊ नशेत होते. नशेत त्यांच्यात पैशावरुन वाद झाला. या वादातून रमेशने सुमनची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो घटनास्थळावरुन फरार झाला, असे सुमनचा दुसरा भाऊ श्याम सिंह याने सांगितले.

हे सुद्धा वाचा

स्थानिक पोलिसात हत्येचा गुन्हा नोंद

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. पाढर पोलिसांनी रमेश विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध सुरु केला आहे.

घरगुती वादातून पतीनेच डॉक्टर पत्नीचा काटा काढला

पती-पत्नीतील घरगुती वादातून डॉक्टर पतीनेच आपल्या डॉक्टर पत्नीची निर्घृ हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील लखिमपूर खिरी येथे उघडकीस आली आहे. हत्येनंतर पत्नीचा मृतदेह 400 किमी दूर नेऊन अंत्यसंस्कार केले, त्यानंतर पोलिसात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तपास सुरु केला असता अखेर आरोपी जाळ्यात अडकला. पोलिसांनी आरोपी पतीसह त्याला मदत करणाऱ्या त्याच्या पित्याला अटक केली आहे.